आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिभ्रंशाचा धोका लठ्ठपणामुळे कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जास्त वजनामुळे गंभीर आजार जडण्याचा इशारा दिला जात असला तरी लठ्ठपणाचा फायदाही समोर आला आहे. जास्त वजनामुळे डिमेन्शियाचा (स्मृतिभ्रंश) धोका कमी होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधनातील तथ्य वैद्यकीय सल्ल्यापेक्षा भिन्न मिळाल्याने संशोधकही चकित झाले आहेत.

लान्सेट डायबिटीस अँड अँडोक्राननोलॉजीच्या संशोधनात साधारण २० लाख ब्रिटिश लोकांच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये कमी वजन असणार्‍यांना डिमेन्शियाचा धोका सर्वात जास्त असल्याचे दिसून आले. डिमेन्शियावर काम करणार्‍या संस्था अद्यापही धूम्रपान न करणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. आधुनिक आरोग्याशी संबंधित मुद्द्यांमध्ये डिमेन्शिया महत्त्वपूर्ण समस्या आहे.

सन २०५० पर्यंत या रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ होऊन १३.५ कोटी होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर कोणताच इलाज नाही. निरोगी आरोग्याची जीवनशैली अंगीकारणे हाच त्यापासून बचाव करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला आहे. मात्र, ते चुकीचेही असू शकते.
संशोधन पथकाचे प्रमुख डॉ. नवाब क्विजिलबाश यांनी हे आश्चर्यकारक निष्कर्ष असल्याचे सांगितले. सामान्य आणि निरोगी बॉडी मास इंडेक्स असणार्‍या लोकांच्या तुलनेत अधिक वजन आणि लठ्ठपणाने त्रस्त लोकांमध्ये डिमेन्शियाचा धोका कमी असतो. हे निष्कर्ष मागील अनेक अभ्यासांपेक्षा भिन्न आहेत. तुम्ही एकाच वेळी सर्व अभ्यास एकत्र केल्यास योग्य निष्कर्षाच्या प्रकरणांत आमचा अभ्यास या सर्वांना मात देईल, असे ते म्हणाले.

व्हिटॅमिन डीची कमतरता धोकादायक
संशोधनात सुरक्षात्मक स्थितीचे कारण सापडले नाही. व्हिटॅमिन डी आणि आणखी काही कमतरता डिमेन्शिया होण्याचा धोका वाढवते. मात्र, जे लोक जास्त जेवण करतात त्यांना हा धोका कमी होऊ शकतो. मात्र, त्याचबरोबर या संशोधनामुळे वाढते वजन चांगले असे म्हणू शकत नाही,असा इशारा डॉ. क्विजिलबाश यांनी दिला. हृदयरोग, हृदयविकाराचा धक्का, मधुमेह, काही प्रकारचे कॅन्सर आणि आणखी काही आजार लठ्ठपणाशी संबंधित आहेत.

आश्चर्यकारक
ऑक्सन एपिडेमिओलॉजी अँड द लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड मेडिसिनच्या संशोधन पथकाने दोन दशकांत सरासरी ५५ वर्षे वयाच्या साधारण १९ लाख लोकांच्या आरोग्य नोंदीचा अभ्यास केला. यामध्ये निरोगी व्यक्तींच्या तुलनेत कमी वजन असणार्‍यांमध्ये डिमेन्शियाचा धोका ३९ टक्के जास्त होता. मात्र, अधिक वजन असणार्‍या लोकांमध्ये डिमेन्शियाचा धोका १८ टक्के कमी होता, लठ्ठ लोकांमध्ये हा आकडा २४ टक्के दिसून आला.