आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fascinating Photos Of Life In The Arab Holy City Before Israel Came To Existence

जेरुसलेमचे ऐतिहासिक PHOTOS, जेव्हा जन्मलाही नव्हता इस्रायल; जाणून घ्या या शहराचा वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला जेरुसलेम हीच राजधानी म्हणून घोषित करणार असा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी अमेरिकेची इस्रायलमधील दूतावास सुद्धा जेरुसलेमला हलवणार असेही त्यांनी स्पष्ट केले. हा अमेरिकेच्या इस्रायल-पॅलेस्टाईन धोरणांतील सर्वात मोठा बदल आहे. ट्रम्प यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे आखाती राष्ट्रांसह सर्वच मुस्लिम देशांमध्ये तीव्र आंदोलनांचा इशारा देण्यात आला आहे. काही देशांमध्ये तर निदर्शनेही सुरू झाली आहेत. सौदी अरेबियाने हा साऱ्या जगातील मुस्लिमांच्या भावना भडकावण्याचे कारण ठरेल असा इशारा दिला आहे. तुर्की, जॉर्डन आणि पॅलेस्टाइनने देखील असेच संकेत दिले आहेत. 

 

अशी झाली इस्रायलची निर्मिती...
> दुसऱ्या महायुद्धापर्यंत इस्रायलचा नामोल्लेखही नव्हता. त्या जागेवर केवळ पॅलेस्टिनी लोकांचे वास्तव्य होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या हिटरलने केलेल्या अत्याचानंतर जर्मनीचे सगळ्याच ज्यू शरणार्थींनी पॅलेस्टाईनमध्ये शरण घेण्यास सुरुवात केली. 
> हळू-हळू 1948 पर्यंत साऱ्या जगातील ज्यू समुदायाला तेथे बोलावण्याचे आवाहन करण्यात आले आणि इस्रायलची स्थापना करण्यात आली. उल्लेखनीय बाब म्हणजे, पॅलेस्टाइनला अद्याप अधिकृत देशाचा दर्जा देण्यात आलेला नाही.
> संयुक्त राष्ट्रने बहुमताने ठराव मंजूर करून इस्रायलला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला. तसेच जेरुसलेमला स्वायत्त ठेवण्यात आले. 1947 मध्ये झालेल्या त्या ठरावात पॅलेस्टाईनला देशाचा दर्जा देण्यात आलेला नाही. 
> इस्रायलचे सगळेच व्यवहार तेल अवीव येथून चालतात. त्यांचे सरकारी मुख्यालय, मंत्रालय आणि विविध देशांचे दूतावास सुद्धा तेल अवीव येथेच आहेत. 

 

जेरुसलेमवर वाद का?
- जेरुसलेममध्येच ख्रिस्ती, मुस्लिम आणि ज्यू समुदायाचे धार्मिक स्थळ आहेत. टेम्पल माउंट आणि अल-अक्सा मशीद (मुस्लिमांचे तिसरे सर्वात पवित्र ठिकाण) आहे.
- 1967 मध्ये इस्रायल आणि अरब देशांमध्ये युद्ध झाले. त्याच युद्धात विजय मिळवल्यानंतर इस्रायलने अख्ख्या जेरुसलेमवर ताबा मिळवला. तसेच जेरुसलेमला आपल्या देशाची राजधानी घोषित केले होते. 
- या घोषणेला संयुक्त राष्ट्र किंवा कुठल्या आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिलेली नाही. इस्रायलचा सर्वात जवळचा मित्र राष्ट्र अमेरिकेने सुद्धा जेरुसलेमला राजधानी मानण्यास नकार दिला. तसेच तेल अवीवमध्ये आपले दूतावास ठेवले. 
- आंतरराष्ट्रीय समुदायाने विरोध केला असतानाही गेल्या कित्येक दशकांपासून इस्रायल या शहरात अनाधिकृत बांधकाम आणि कॉलनी स्थापित करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायल ते कधीच मान्य केले नाही. उलट, संयुक्त राष्ट्रात जाऊन वेळोवेळी संयुक्त राष्ट्रावरच टीका केली. आता अमेरिकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्याच जेरुसलेमला इस्रायलची राजधानी ठरवायला निघाले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जेव्हा इस्रायलचे नामोनिशाणही नव्हते तेव्हाचा जेरुसलेम...

बातम्या आणखी आहेत...