आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर हुकुमशहाची मुलगी, आधी ठेवले वेड्याच्या इस्पितळात मग झाली बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांची मुलगी गुलनारा... - Divya Marathi
उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांची मुलगी गुलनारा...
इंटरनॅशनल डेस्क- आशियाई देश उज्बेकिस्तान वर्ष 1991 मध्ये सेव्हियत यूनियनच्या विघटनानंनतर 1 सप्टेंबर रोजी स्वतंत्र देश बनला होता. यानंतर इस्लाम करीमोव 1991 ते 2016 पर्यंत उज्बेकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष राहिले. करीमोव यांचे गेल्या वर्षी 2 सप्टेंबर, 2016 रोजी निधन झाले होते. यानंतर शौकत मिर्जियोव देशाचे दुसरे प्रेसिडेंट बनले. मात्र, करीमोवच्या मृत्यूनंतर त्यांची राजकीय वारसदार त्यांची मुलगी गुलनारा होती. मात्र, पित्याच्या मृत्यूनंतर एका आठवड्यातच गुलनारा बेपत्ता झाली होती. लंडन बेस्ड पब्लिकेशनच्या माहितीनुसार, दोन वर्षानंतर गुलनारा उज्बेकिस्तानच्या एका मेंटल हॉस्पिटलमध्ये दिसली होती त्यानंतर काही महिन्यातच तिच्या मृत्यूचे वृत्त आले. यामागे शौकत यांचा हात असल्याचे बोलले जाते. मात्र, उज्बेकिस्तान सरकार आताही तिला बेपत्ता असल्याचे सांगते. सेव्हियत यूनियनमध्ये सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक होती गुलनारा....
 
- गुलनारा एके काळी सोवियत यूनियनमधील सर्वात श्रीमंत महिलांच्या टॉप टेन लिस्टमध्ये होती. 
- वर्ष 2000 मध्ये हार्वर्ड यूनिवर्सिटीत शिकायला गेल्यावर तिला परराष्ट्र विभागात सल्लागार बनवले होते. 
- ती उज्बेकिस्तानची डेप्टी फॉरेन मिनिस्टर सुद्धा राहिली. यानंतर पॉप सिंगर बनून संपूर्ण देशात चमकली. 
- गुलनारा इतकी सुंदर होती की, उज्बेकी लोग तिला ‘प्रिन्सेस गुलनारा’ म्हणायचे.
 
वर्षे 2013 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप-
 
- व्यावसायाने एक मॉडेल, पॉप सिंगर, रायटर आणि डिझायनर गुलनारावर वर्ष 2013 मध्ये 1 बिलियन डॉलर ( सुमारे 6707 कोटी रुपये) चा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. 
- यासोबतच तिच्यावर स्कॅंडिनेवियन आणि रशियन टेलिकॉम कंपन्यांकडून मोठी रक्कम आणि शेयर घेतल्याचा आरोप लागला. पनामा पेपर लीक्समध्येही तिचे नाव समोर आले होते.
- यामुळेच तिचे वडिल इस्लाम करीमोव यांनी तिला दोन वर्षे नजरकैदेत ठेवले होते.
- गुलनाराचे लग्न 1991 मध्ये अमेरिकन बिजनेसमॅन मंसूर मक्सूदीसोबत झाले होते. मात्र, 2001 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. 
- गुलनाराला दोन मुलांत मुलगा इस्लाम आणि मुलगी ईमान आहेत. हे दोघेही ब्रिटनमध्ये राहतात.
 
पित्याच्या राजवटीला मुलीकडूनच मिळाले होते आव्हान-
 
- जगातील एक क्रूर हुकुमशहाच्या यादीत उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांचे नाव होते. त्यांचा जन्म 1938 मध्ये झाला.
- करीमोव 1991 ते 2016 पर्यंत उज्बेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष राहिले. 
- करीमोव यांच्या क्रूर हुकुमशहा राजवटीच्या इतक्या काळात एकदाच आव्हान मिळाले ते ही आपल्याच गुलनारा या मुलीकडून. 
- सुंदर गुलनारा उज्बेकिस्तानची फेमस मॉडेल आणि पॉप सिंगर सुद्धा राहिली. 
- गुलनाराच्या वाईट दिवसाची सुरुवात तिच्याच पित्याच्या काळात झाली होती. 
- याबाबत सांगितले जाते की, करीमोव यांनीच गुलनारावर खूप अत्याचार केले व शेवटी तिला नजरकैदेत ठेवले. 
- करीमोव यांचा इतिहास क्रूरच राहिला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणीच बोलण्याची हिंमत नव्हती. 
- अखेर करीमोवला मुलगी गुलनारानेच आव्हान दिले होते. मात्र नंतर दोघेही दोन महिन्याच्या काळात पडद्याआड गेले होते.
- उज्बेक नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिस (एसएनबी)च्या माहितीनुसार गुलनाराला विष देऊन मारण्यात आले. 5 नोव्हेंबर 2016 रोजी उज्बेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये गुलनाराचा मृत्यू झाला होता. मात्र, सध्याचे राष्ट्रप्रमुख शौकत हे गुलनारा अजूनही बेपत्ता असल्याचे सांगतात.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आपल्या क्रूर पित्याला कधीकाळी आव्हान दिलेल्या व आता पडद्याआड गेलेल्या गुलनाराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...