आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट सीट, पाहायला लोकांची होते गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क स्थित गुग्गेनहाईम म्यूझियममध्ये ठेवलेल्या गोल्डन टॉयलेटला इटलीतील आर्टिस्ट मॉरिजियो कॅटेलेनने बनविले आहे. - Divya Marathi
न्यूयॉर्क स्थित गुग्गेनहाईम म्यूझियममध्ये ठेवलेल्या गोल्डन टॉयलेटला इटलीतील आर्टिस्ट मॉरिजियो कॅटेलेनने बनविले आहे.
इंटरनॅशनल डेस्क- खरं तर आपण जेव्हा सोन्याचे नाव ऐकतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते दागिने, ज्वेलरी. मात्र, अमेरिकेतील एका म्यूझियममध्ये 18 कॅरेट सोन्यापासून एक टॉयलेट बनवलेले आहे. या टॉयलेटला इटलीतील एका आर्टिस्टने बनवले आहे, ज्याला पाहायला आतापर्यंत 1 लाख लोक आले आहेत. टॉयलेट पाहायला लागते लाईन....
 
- अमेरिकेतील न्यूयॉर्क स्थित गुग्गेनहाईम म्यूझियममध्ये ठेवलेल्या गोल्डन टॉयलेटला इटलीतील आर्टिस्ट मॉरिजियो कॅटेलेनने बनविले आहे. त्याचे नाव ‘अमेरिका’ ठेवले आहे. 
- म्यूझियमचे संचालक मायकल जॉलच्या माहितीनुसार, या टॉयलेटला पाहायला नेहमीच लोकांची गर्दी होते. 
- मायकलच्या माहितीनुसार, या टॉयलेटला म्यूझियमच्या पाचव्या मजल्यावर सामान्य टॉयलेट असते तसेच ठेवले आहे. तसेच त्याचा व्यवस्थित वापर होतो.
- टॉयलेटला बनविणारा कॅटलेन नेहमीच असे आर्टवर्क बनविण्यासाठी प्रसिद्ध राहिला आहे जो श्रीमंत आणि गरीबांतील दरी दाखवतो.
- आपल्या माहितीसाठी हे की, सोन्याने बनवलेले हे टॉयलेट मागील एका वर्षापासून म्यूझियममध्ये प्रदर्शनात ठेवले गेले आहे आणि येत्या 15 सप्टेंबरपासून पर्यटक व लोकांसाठी दाखविण्यास बंद करण्यात येणार आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या टॉयलेटचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...