आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचे आणखी एक लक्षवेधी पाऊल, कंपनीने म्हटले \'लॅंडमार्क मोमेंट\'!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवाडा येथील वाळवंटातील गुगलचा सोलर प्लॅंट... - Divya Marathi
नेवाडा येथील वाळवंटातील गुगलचा सोलर प्लॅंट...
इंटरनॅशनल डेस्क- नेवाडा (कॅलिफोर्निया) येथील वाळवंटातील वरील सौर संयंत्रांची रचनाच विशेष आहे. दिवसा प्रकाश वाढत जातो, तसे पॅनल्सवर गुगल असे नाव ठळकपणे दिसते. आकाशातून हे नाव स्पष्टपणे दिसते. गुगलला डेटा सेंटर्ससाठी सर्वाधिक ऊर्जेची गरज असते. सौर पॅनल आणि पवन ऊर्जेसाठी आता खर्च कमी लागत असल्यामुळे पुढील वर्षातच हा मोठा बदल करण्याची कंपनीची योजना आहे. 2017 पासून फक्त सोलर ऊर्जा वापरणार गुगल कंपनी...

- पुढील वर्षापासून गुगल कंपनीचे सर्व डेटा सेंटर्स, कार्यालये आणि 60 हजार कर्मचाऱ्यांच्या मशिन्स पूर्णपणे अपारंपरिक ऊर्जास्रोतावर अवलंबून होतील, अशी घोषणा गुगलने केली आहे.
- गुगल ही इतर कंपन्यांकडून अपारंपरिक ऊर्जा खरेदी करणारी सर्वात मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे.
- गेल्या वर्षी कंपनीने गरजेच्या व एकूण वापराच्या 44 टक्के ऊर्जा पवन सौर ऊर्जेच्या कंपनीकडून खरेदी केली होती.
- या सौर संयंत्रात गुगलने 1142 कोटींची गुंतवणूक केली आहे. आता तर या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुकीचा कंपनीचा विचार आहे.
- जागतिक हवामान बदल व अणुऊर्जाचे धोके टाळण्यासाठी सोलर ऊर्जा हा बेस्ट पर्याय आहे असे गुगलचे म्हणणे आहे. सोलर ऊर्जा वापरली तर प्रदूषणातही मोठी घट होईल असे गुगलचे म्हणणे आहे.
- शिवाय सोलर ऊर्जा ही इतर सर्व ऊर्जेपेक्षा स्वस्त व परवडणारी आहे.
- सोलर ऊर्जा पुरवणे हा भविष्यात एक मोठा उद्योग व व्यवसाय बनणार आहे. त्यामुळे आम्ही त्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करून व्यवसाय वृद्धीकडे लक्ष देणार असल्याचे गुगलचे ऊर्जा विभागाचे मार्क ओमान यांनी सांगितले. आमच्यासाठी हा लँडमार्क मोमेंट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, भारताची काय स्थिती आहे सोलर पावरबाबत व जागतिक तज्ज्ञांचे काय आहे म्हणणे....
बातम्या आणखी आहेत...