आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी मेंदूचाही "बॅकअप' ठेवता येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - संगणकप्रणीत अनेक वस्तूंचा किंवा सॉफ्टवेअर्सचा बॅकअप घेण्याविषयी आता काही नवल नाही. मात्र, मानवी मेंदू बॅकअप करून ठेवता येईल का? याचे उत्तर नक्कीच होय असे असेल. कारण, भविष्यात गैरजैविक बुद्धीच्या प्रभावामुळे ते शक्य होऊ शकणार आहे. मानवी मेंदूची संगणकाशी तुलना काही नवल नाही. परंतु, भविष्यात मानवाचा मेंदू संगणकाच्या कृत्रिम मेंदूपेक्षा अधिक बुद्धिमान होईल, यात काही शंका नसल्याची भविष्यवाणी गुगल आणि टेक-३० चे अभियांत्रिकी संचालक रे कुर्जवेल यांनी केली आहे. ते एक्सपोटेन्शिअल फायनान्स कॉन्फरन्समध्ये बोलत होते. ते म्हणाले, २०३० पर्यंत आपला मेंदू हजारो संगणकांच्या क्लाऊडशी जोडण्यास सक्षम होईल. हे संगणक आपल्या विद्यमान बुद्धीत वाढ करतील.

नॅनोबोट्सच्या माध्यमातून मानवी मेंदू जोडला जाईल. डीएनएच्या पेशींपासून नॅनोबोट्स हे सूक्ष्म रोबोट तयार केले जातील. कुर्जवेल पुढे म्हणाले की, तेव्हा आपली विचार समजून घेण्याची क्षमता जैविक तसेच गैरजैविक असेल. हजारो संगणकांपासून तयार क्लाऊड जेवढा मोठा आणि जटिल असेल तितकाच आपल्या बुद्धीचाही अधिक विकास होईल. हे २०३० च्या दशकाच्या शेवटी किंवा २०४० च्या दशकाच्या सुरुवातीला शक्य होईल, असेही ते म्हणाले.

कल्पनेपलीकडचा विचार शक्य
आगामी काळात मानवी विचारावर गैरजैविक बुद्धीचा प्रभाव असेल. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीचे पूर्ण बॅकअप ठेवू शकू. आपल्या मर्यादा ओलांडून पुढे जाणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आम्ही या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. त्यादृष्टीने सध्या संशोधने होत आहेत. याचा परिणामही लवकरच दिसेल.

धोक्यासाठी अलर्ट
कृत्रिम बुद्धीचा मानवी मेंदूत शिरकाव धोक्याचाही ठरू शकतो. या शंकेबाबत कुर्जवेल म्हणाले की, तंत्रज्ञान विकास करताना आम्ही नेहमीच एक प्रकारच्या नैतिक मर्यादेत राहून काम करत असतो. त्यामुळे संभाव्य धोक्यांवरही नियंत्रण शक्य आहे.
बातम्या आणखी आहेत...