आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू व ज्यू लेस्बियन महिलांचे अखेर 20 वर्षानंतर लग्न, वाचा त्यांची Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलावती मिस्त्री (डावीकडे) आणि मिरियम जॅफरसन... - Divya Marathi
कलावती मिस्त्री (डावीकडे) आणि मिरियम जॅफरसन...
इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमधील लेइसेस्टर शहरात शनिवारी एक अनोखे लग्न पार पडले, जे सध्या चर्चेत आहे. खरं तर, हे ब्रिटनमधील एक असे पहिले लेस्बियन मॅरेज आहे ज्यात दोन वेगवेगळ्या धर्मातील कपल विवाह बंधनात अडकले. भारतीय वंशाची कलावती लेइसेस्टर शहरातील तर ज्यू समाजातील मिरियम जॅफरसर अमेरिकेतील टेक्सास शहरात राहणारी आहे. 20 वर्षापासून सुरु होते अफेयर...
 
- 48 वर्षाची कलावती आणि 46 वर्षाची मिरियमची फ्रेंडशिप सुमारे 20 वर्षापासून आहे. 
- या दोघीतील मैत्री काही काळातच रिलेशनशिपमध्ये बदलली आणि आता दोघींनी लग्नाचा निर्णय घेतला. 
- याबाबत कलावतीचे म्हणणे आहे की, हे नाते मी माझ्या कुटुंबियांपासून लपवून ठेवले होते. काही दिवसापूर्वीच माझ्या रिलेशनशिपबाबत घरच्या मंडळींना सांगितले.
- मात्र, सुरुवातीला कलावतीच्या घरचे नाराज झाले पण त्यांनी नंतर लग्नाला परवानगी दिली. तसेच काहीसे मिरियमच्याही घरी घडले.
- शनिवारी जेव्हा लेइसेस्टर शहरात या दोघींचे लग्न झाले तेव्हा त्यांची दोन्ही कुटुंबे आणि मित्रपरिवार जमा झाला होता.
- हे लग्न भारतीय रिती-रिवाजांनुसार पार पडले त्यावेळी त्या दोघी लाल जोड्यात दिसून आल्या.
 
अशा भेटल्या एकमेंकींना-
 
- एका इंटरव्यूदरम्यान कलावतीने सांगितले की, आम्ही दोघींही इंटरफेथ ऑर्गेनायजेशनमध्ये काम करत होतो.
- या दरम्यान एकदा कलावतीला एका प्रोग्रॅमसाठी टेक्सासमध्ये जावे लागले तेथे तिची मिरियमची भेट झाली. 
- कलावती सांगते, माझी मिरियमसोबत टेक्सासमध्ये तेव्हा भेट झाली जेव्हा मी 26 वर्षाची तर मिरियम 24 वर्षाची होती.
- पहिल्याच भेटीत आम्ही चांगल्या मैत्रिणी बनलो. त्यानंतर आम्ही एकमेंकींच्या संपर्कात राहिलो. फोन, इंटरनेटद्वारे बोलत राहायचो.
- यानंतर आमच्यात काहीतरी स्पेशल असल्याचे जानवले. त्यामुळे आम्ही व्हॅकेशनला आवर्जून भेटू लागलो. आम्ही प्रेमात असल्याचे एकमेंकींच्या लक्षात येताच एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 
- कलावती सांगते मी, हिंदू धर्मातील असल्याने कुटुंबिय हे स्वीकारणार नाहीत याची कल्पना होती. त्यामुळे ही बाब मी लपवून ठेवली. मिरियमचीही स्थिती अशीच काहीसी होती.
- अखेर आम्ही लग्न करण्याचा आणि कुटुंबियांना माहिती देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या नाराजीनाम्यानंतर दोघींच्याही घरच्यांनी या लग्नाला परवानगी दिली.
- कलावती आता मिरियमकडे अमेरिकेत लवकरच शिफ्ट होणार आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कलावती आणि मिरियमच्या लग्नाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...