आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या महायुध्‍दात 2 लाख भारतीय सैनिकांनी जर्मनीविरूद्ध घेतला होता सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्च 1944 मध्‍ये इराकमध्‍ये भारताच्या 31 व्या लष्‍करी विभागाचे शेरमान टँकचे दोन क्रू मेंबर्स. - Divya Marathi
मार्च 1944 मध्‍ये इराकमध्‍ये भारताच्या 31 व्या लष्‍करी विभागाचे शेरमान टँकचे दोन क्रू मेंबर्स.
इंटरनॅशनल डेस्क- दुस-या महायुध्‍दाच्या काळात ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या भारताने सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीविरुध्‍द युध्‍दाची घोषणा केली होती. या युध्‍दात ब्रिटनच्या बाजूने भारताचे दोन लाख सैनिक सहभागी झाले होते. भारताचे सैनिक आफ्र‍िका, युरोप आणि आशियात वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. हे युद्ध सुमारे सहा वर्षे सुरु होते. 1 सप्टेंबर, 1939 रोजी जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने पोलंडवर हल्ला करुन युध्‍दाची घोषणा केली होती. तर, अमेरिकेने जपानच्या नागासाकी व हिरोशिमा शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर पुढे सप्टेंबर 1945 मध्ये जपानने अमेरिकेसमोर शरणागती पत्कारली. याबरोबरच दुस-या जागतिक युध्‍दाची समाप्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यापूर्वी फेब्रुवारी 1945 मध्ये दुस-या जागतिक युध्‍दात तीन नायक ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, अमेरिकेचे अध्‍यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट आणि सोविएत संघाचा नेता जोसेफ स्टॅलिन यांचा याल्टामध्‍ये बैठक झाली होती. या बैठकीत उद्ध्‍वस्त झालेल्या युरोपची पुनर्बांधणीवर चर्चा झाली होती.
 
 
कुठे-कुठे भारतीय लष्‍कराने युध्‍द लढले...
 
- इथिओपियामध्‍ये इटलीच्या सैन्याविरोधात. 
- इजिप्त, लीबिया, ट्युनीशियात इटली आणि जर्मनी लष्‍कराविरोधात. 
- मलायात जपानविरुध्‍द.
 
जागतिक युध्‍दात भारत का सामील झाला?
 
भारताच्या बहुतेक प्रांतात, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमारवर ब्रिटनचे राज्य होते. यामुळे पूर्ण प्रदेश जागतिक युध्‍दात सामील झाले. दुसरीकडे भारतातील अनेक राजांनी नाझी आणि फॅसिस्टवादी शक्तीशी लढण्‍यासाठी सरकारला मदत दिली होती.
 
फेब्रूवारी का खास?
 
फेब्रूवारी 1945 मध्‍ये दुस-या जागतिक युध्‍दात तीन नायक ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, अमेरिकेचे अध्‍यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट आणि सोविएत संघाचा नेता जोसेफ स्टॅलिन यांचा याल्टामध्‍ये बैठक झाली होती. या बैठकीत उद्ध्‍वस्त झालेल्या युरोपची पुनर्बांधणीवर चर्चा झाली होती.
 
एक नजर दुस-या जागतिक युध्‍दावर?
 
- 1 सप्टेंबर, 1939 रोजी जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने पोलंडवर हल्ला करुन युध्‍दाची घोषणा केली होती. 
- त्याच्याबरोबर इटली, जपान, हंगेरी, रोमानिया आणि बल्गेरियाही युध्‍दात उतरले होते. 
- दुस-या गटात अमेरिका, सोविएत संघ, ब्रिटन, चीन, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, पोलंड, युगोस्लाव्हिया, ब्राझील, ग्रीस, नेदरलँड्स, न्यूझीलँड, नॉर्वे, दक्षिण आफ्र‍िका, झेकोस्लोव्हाकिया आणि मंगोलियाचे लष्‍कर होते. 
- सहा वर्षे चाललेल्या या युध्‍दात दोन्ही गटांतील 2 कोटी 40 लाख फक्त सैनिक मारले गेले. चार कोटी 90 लाख नागरिकांना जीव गमवावा लागला होता. 
- अमेरिका आणि मित्र राष्‍ट्रांची सहा कोटी दहा लाख आणि जर्मनीचे एक कोटी वीस लाख लोक मारले गेले. 
- अमेरिकेने सहा आणि नऊ ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर या दोन शहरांवर अणुबॉम्ब डागले होते. 
- 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानचे शासक हिरोहितो यांनी रेडिओवर शरणागतीची घोषणा केली. 
- यानंतर दोन सप्टेंबर 1945 रोजी जपानने अमेरिकेसमोर शरणागती पत्कारली. याबरोबरच जागतिक युध्‍दाची समाप्ती झाली.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा दुस-या महायुध्‍दातील भारतीय सैन्याच्या सहभागाची छायाचित्रे...
 
बातम्या आणखी आहेत...