आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी भारतातून यूरोपात गेले हे जिप्सी लोक, आज जगतात अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमा समुदाय भारताशी संबंधीत असल्याचे नुकतेच 'करंट बायोलॉजी' नावाच्या नियतकालिकाने केलेल्या संशोधनातूही सिद्ध झाले आहे. - Divya Marathi
रोमा समुदाय भारताशी संबंधीत असल्याचे नुकतेच 'करंट बायोलॉजी' नावाच्या नियतकालिकाने केलेल्या संशोधनातूही सिद्ध झाले आहे.
इंटरनॅशनल डेस्क- भारतातून अनेक लोक विदेशात गेले आणि तिथेलच झाले आहेत. असाच एक समाज आहे जो यूरोपात राहातो ज्याचे भारतासोबत कनेक्शन आहे. यूरोपातील हा समाज तेथील मायनॉरिटी ग्रुप म्हणून ओळखला जातो त्यांना रोमा समाज म्हटले जाते. या समुदायाचे जवळपास एक कोटी लोक यूरोपात राहात आहेत. ही जमात कायम फिरस्ती असल्याने त्यांना जिप्सी ही देखील म्हटले जाते. ते संपूर्ण यूरोपात पाहायला मिळतात.
 
भारतातून गेले होते यूरोपात-
 
- रोमा समुदाय भारताशी संबंधीत असल्याचे नुकतेच 'करंट बायोलॉजी' नावाच्या नियतकालिकाने केलेल्या संशोधनातूही सिद्ध झाले आहे. 
- ते भारतातील उत्तर आणि उत्तर पश्चिम परिसराशी संबंधीत लोक आहेत.
- ते 1500 वर्षांपूर्वी इराणमध्ये पोहोचले होते, त्यानंतर 15 व्या शतकात इराणमार्गे यूरोपात गेले. 
- सध्या त्यांची यूरोपातील संख्या एक कोटींच्या आसपास आहे. 
- मात्र ते संपूर्ण यूरोपात पसरलेले असल्यामुळे त्यांचे डाटा कलेक्शन सोपे नाही. 
- शेकडो वर्षांपासून यूरोपात राहात असताना आजही त्यांच्यासोबत भेदभाव होतो.
 
वेगवेगळ्या धर्मांशी यांचे नाते-
 
- रोमा समुदायाचे लोक मुळतः हिंदू धर्माला मानणारे मानले जातात. 
- भारतातून इराणमार्गे यूरोपात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे धर्मांचे पालन सुरु केले. 
- आज रोमा समुदायातील काही लोक ख्रिश्चन तर काहींनी मुस्लिम धर्म स्विकारला आहे. 
- त्यांची संस्कृतीही वेगवेगळ्या धर्म आणि पंथांनी प्रभावित असल्याचे दिसते. 
 
नाझी काळात मोठा अन्याय सहन केला-
 
- रोमा समुदायाने यूरोपात स्थायिक होताना अनेक अत्याचार सहन केले होते. 
- नाझी काळात यांना वंशभेदाचे चटकेही सहन करावे लागले होते. 
- इतिहासकारांच्या मते यादरम्यान 2,20,000 ते 5,00,000 रोमा लोकांना नाझींच्या छळामुळे जीव गमवावा लागला होता. 
 
बालविवाह सामान्य बाब -
 
रोमा समुदायात बालविवाह प्रथा ही सामान्य बाब समजली जाते. या समुदायातील पाच वर्षांच्या मुलीच्या लग्नाच्या घटनेची मोठी चर्चा झाली होती. या मुलीचे 11 वर्षाच्या मुलासोबत लग्न लावून देण्यात आले होते. 
 
यूरोपात कुठे आहे हा समूदाय-
 
सेंट्रल आणि इस्टर्न यूरोपातील बुल्गेरिया, युगोस्लाव्हिया, मॅसेडोनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, सर्बिया आणि हंगेरी या भागात रोमा समुदायाचे लोक आढळून येतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोमा कम्युनिटीचे परिस्थिती दाखविणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...