आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा होता अखंड भारत, काळाच्या ओघात असे होत गेले हिंदूस्थानचे तुकडे, वाचा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1876 पर्यंत भारत हा असा अखंड होता. त्यानंतर इंग्रजांनी हळू हळू 71 वर्षात भारताचे 7 तुकडे पाडले. - Divya Marathi
1876 पर्यंत भारत हा असा अखंड होता. त्यानंतर इंग्रजांनी हळू हळू 71 वर्षात भारताचे 7 तुकडे पाडले.
इंटरनॅशनल डेस्क- हिंदू जागरण मंच आणि युवा वाहिनीने सोमवारी अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला. या निमित्ताने यूपीमध्ये आर्य समाज मंदिरात एका संमेलनाचे आयोजन केले होते. भारत मातेला भूतकाळातील वैभव प्राप्त करून देण्यासाठी अखंड भारत संकल्प दिवस दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. याच दिवशी 1947 रोजी भारतापासून शेवटचे राष्ट्र पाकिस्तान जन्माला आला होता. त्यामुळे या दिवशी अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो. 
 
भारत हा प्रचिन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी जरा वेगळा होता. म्हणजेच भारत एक विशाल देश होता. इराणपासून इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले. कधी काळी भारतात गणल्या जाणाऱ्या अशा देशांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याने तुमची मान अभिमानाने उंचावल्याशिवाय राहणार नाही.
 
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तसेही एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी 1876 ते 1947 या 71 वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले. भारताचा सर्वात शेवटचा तुकडा 1947 साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत आताचा बांगलादेश जन्माला घातला.
 
वर्ष 1947 मध्‍ये झालेली भारत- पाकिस्‍तान फाळणी ही मागील 2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती. ज्‍या राजांनी, शक्‍तींनी मागील 2500 हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्‍यांनी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्‍याचा उल्‍लेख इतिहासातील कुठल्‍याच ग्रंथात नाही. त्‍यामुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्‍टी मिळते.
 
पाकिस्‍तान आणि बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही. या निमित्त आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की, पूर्वी अखंड भारत नेमका कसा होता  व तो कसा काळाच्या ओघात टप्प्याटप्प्याने कसा विभागत गेला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अखंड भारताचे कसे झाले विभाजन...
बातम्या आणखी आहेत...