आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या 12 व्या वर्षी बट सर्जरी, 16 व्या वर्षी ब्रेस्ट इंप्लांट, येथे नॅचरल ब्युटीला नाही स्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काराकस - भारतात तब्बल 17 वर्षांच्या विलंबानंतर मिस वर्ल्डचा किताब आला आहे. यासोबतच भारताने जगाला सर्वाधिक ब्युटी क्वीन देणाऱ्या व्हेनेझुएलाची बरोबरी केली आहे. तेल संपन्न देश व्हेनेझुएला ब्युटी पीजेंट्सचा देश म्हणूनही ओळखल्या जातो. या देशातील तरुणींनी 22 वेळा विविध जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. व्हेनेझुएलात या सुंदर तरुणी कशा घडवल्या जातात आणि वयाच्या 12 व्या वर्षीच कशी त्यांची सर्जरी केली जाते हे यानिमित्ताने आम्ही सांगत आहोत. 

 

वयाच्या 16 व्या वर्षी ब्रेस्ट इंप्लांट
> व्हेनेझुएलाने 6 वेळा मिस वर्ल्ड, 7 वेळा मिस युनिव्हर्स, 7 वेळा इंटरनॅशनल आणि 2 वेळा मिस अर्थ असा बहुमान पटकावला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने ताज मिळवण्यासाठी येथील तरुणींवर अक्षरशः अत्याचार झाले आहेत. 
> या देशात अगदी पौगंडावस्थेत प्रवेश करताच मुलींना मॉडेलिंगमध्ये ढकलले जाते. 
> कित्येक वेळा वयाच्या 12 व्या वर्षी मुलींना 'बट लिफ्ट' आणि वयाच्या 16 व्या वर्षी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी प्रक्रियेतून जावे लागते. 

> 2013 मध्ये मिस व्हेनेझुएला राहिलेली वी मे नवा या सुंदरीने बीबीसीशी संवाद साधताना सांगितल्याप्रमाणे, तिने वजन वाढेल या भितीने जिभेचे चोचले कमी करण्यासाठी चक्क जिभेची सर्जरी केली होती. अनेकवेळा ब्रेस्ट, दांत, नाक आणि शरीराच्या विविध अंगांची सर्जरी केल्याचे तिने मान्य केले. 
> माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या देशात मुलींच्या शरीराची वाढ लवकर करण्यासाठी पालकांकडूनच वयाच्या 8 आणि 9 व्या वर्षीच मुलींना हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जाते. 

 

नॅचरल ब्युटीला नाही स्थान
> सामाजिक कार्यकर्त्या टायली कॅस्टेलानोस यांनी म्हटल्याप्रमाणे, व्हेनेझुएलाची प्रत्येक तरुणी मिस व्हेनेझुएला होण्याचे स्वप्न पाहते. यात नॅचलर ब्युटीला काहीच स्थान नाही. नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यापेक्षा सर्जरी करून शरीरात बदल घडवले जातात. नैसर्गिक सौंदर्यापेक्षा ज्यांनी चांगल्या प्रकारे सर्जरी केली, त्यांना सौंदर्य स्पर्धांमध्ये प्राधान्य दिले जाते. 
> टायलीने सांगितल्याप्रमाणे, सौंदर्य आणि सौंदर्य स्पर्धांसाठी व्हेनेझुएला आदर्श कधीच ठरू शकत नाही. कारण, येथे सौंदर्यवती होण्यासाठी आणिव करण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात.
> व्हेनेझुएलात राहणारी टायली सर्जरीमुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल जनजागृती करत आहे. बट इंजेक्शन आणि सिलिकॉन सर्जरीमुळे शरीराला कोणते नुकसान होतात हे ती आपल्या संस्थेच्या माध्यमातून तरुणींना सांगते. 


'आम्हाला फक्त परफेक्ट महिला हव्या'
> कराकासमध्ये बेलंकाजार सर्वात जुनी आणि नावाजलेली ब्युटी अकॅडमी आहे. ज्याला सौंदर्यवतींची फॅक्ट्री असेही म्हटले जाते. यात अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरीचे क्लिनिक्स आहेत. येथे 600 मुलींना प्रशिक्षण दिले जाते. 
> बेलंकाजारचे संचालक अॅलेक्झांडर वेलास्क्वेझ यांनी सांगितल्याप्रमाणे, आमच्या अकादमीतर्फे जगात व्हेनेझुएलाची चांगली इमेज तयार केली जात आहे. व्हेनेझुएलात सर्वात सुंदर महिला आहेत. तरीही, त्या सुंदर महिलांना परफेक्ट करणे आणचे काम आहे. आमच्याकडून घडवलेल्या सौंदर्यवती जगभरातील ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भल्या-भल्यांना मात देतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या ट्रेनिंग सेंटरचे आतील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...