आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राष्ट्राध्यक्षाला जिवे मारण्यासाठी 634 वेळा रचले षडयंत्र, पण सर्व झाले फेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील तरुणाईत फिडल यांच्याबद्दल क्रेझ होती. - Divya Marathi
जगभरातील तरुणाईत फिडल यांच्याबद्दल क्रेझ होती.
इंटरनॅशनल डेस्क- क्युबा क्रांतीचे प्रणेते व तब्बल पाच दशके अमेरिकी सत्तेला मेटाकुटीस आणणारे क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचा 13 ऑगस्ट रोजी जन्म दिवस होता. १९५९ ते १९७६ पर्यंत ते क्युबाचे पंतप्रधान व १९७६ ते २००८ पर्यंत राष्ट्रपती होते. अमेरिकी मर्जीवर हुकूमशहा झालेल्या फुल्जेंशो बातीस्तांची सत्ता उलथवून ते १९५९ मध्ये सत्तेत आले होते. शीतयुद्ध टिपेला पोहोचले असताना जागतिक मंचावर कम्युनिस्ट नेते म्हणून कॅस्ट्रोंचा उदय झाला. अमेरिका खंडात ते एकमेव कम्युनिस्ट शासक होते. सोव्हियत रशियाच्या पतनानंतरही आपल्या देशात साम्यवादाची मुळे भक्कम ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. ते जगातील सर्वाधिक काळ शासन करणारे तिसरे नेते होते. थायलंडचे राजे भूमिबल अतुल्यतेज व ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर त्यांचा क्रमांक लागतो. अमेरिकेला आणले होते जेरीस....
 
- फिडेल कॅस्‍ट्रो सत्‍तेत येण्‍यापूर्वी क्‍युबाची ओळख ही अमेरिकेच्‍या ओंजळीणे पाणी पिणारे राष्‍ट्र अशीच होती.
- साम्‍यवाद राजवट असलेले क्‍युबा हे पहिले पाश्मिमात्‍य राष्‍ट्र बनले.
- परंतु, फि‍डेल यांनी दाखवलेले साम्‍यवादाचे स्‍वप्‍न दीर्घकाळ टिकले नाही.
- फिडेल हेसुद्धा हुकूशाही मार्गानेच चालले.
- फिडेल यांनी सत्‍तेत येताच क्‍युबामधील अमेरिकेच्‍या सर्व कंपन्‍यांचे राष्‍ट्रीयकरण करून उघड-उघड वैर घेतले.
 
अमेरिकेच्या ११ राष्ट्रपतींशी टक्कर-
 
- अमेरिकेच्या विरोधात ठाम उभा राहणारा नेता अशी कॅस्ट्रोंची ओळख होती. १९५९ च्या क्युबा क्रांतीनंतर अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्रपतीने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 
- अमेरिकेचे ११ राष्ट्रपती आले आणि गेले. मात्र कॅस्ट्रो सत्तेत कायम राहिले. अमेरिकेने प्रतिबंध लादूनही त्यांनी गुडघे टेकले नाहीत..
- त्यामुळे गेल्या वर्षी जेव्हा फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन झाले तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील नेत्यांनी दु:ख व्यक्त केले होते तर अमेरिकेने आनंद साजरा केला होता. क्युबापासून ९० किमी अंतरावर अमेरिकेतील मियामीच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
 
फिडेलचा मुलगा अणुशास्त्रज्ञ- 
 
- फिडेल यांना 8 मुले आहेत. त्यांच्या ज्येष्ठ मुलामध्ये - डियाज बलार्टमध्ये लोक त्यांची झलक पाहातात. तो फिडेलितो नावाने प्रसिद्ध असून अणुशास्त्रज्ञ आहे. 
- हवाना येथील सामाजिक कार्यकर्तीपासून झालेली त्यांची मुलगी एलीना फर्नांडिसने मियामी रेडिओ कार्यक्रमात स्वतः फिडेलला क्रिटिसाइज केले होते. 
- फिडेल यांना दुसरी पत्नी डालिया सोटो हिच्यापासून पाच मुले आहेत. त्या सर्वांचे नाव ए अद्याक्षरापासून सुरु होते. 
- छोटा मुलगा अंटोनिओ नॅशनल बेसबॉल टीमचा फिजिओ आहे.
 
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, फिडेल यांच्याविषयी आणखी काही...
 
बातम्या आणखी आहेत...