इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमधील साउथ हॅम्पटनकडून न्यूयॉर्ककडे चाललेले टायटॅनिक जहाज 15 एप्रिल (1912) रोजी समुद्रात बुडाले होते. व्हाईट स्टार लाईन कंपनीचे हे वजन 52, 310 टन वजनी जहाजाने 10 एप्रिल, 1912 रोजी प्रवास सुरु केला होता. 14 एप्रिलच्या रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी टायटॅनिक जहाजाला हिमनगाचा (बर्फाचा विशाल भाग) कडा धडाकला आणि 2 तास 40 मिनिटात हे जहाज बुडले. या अपघातात 1,500 हून जास्त प्रवासी मारले गेले होते. जहाजावर 2,224 लोक प्रवास करत होते. टायटॅनिकशी संबंधित काही रोचक माहिती....
टायटॅनिकच्या तिकीटाचा दर-
फर्स्ट क्लास : सुमारे 2.60 लाख रुपये (4,350 डॉलर)
सेकंड क्लास : सुमारे एक लाख रुपये (1750 डॉलर)
थर्ड क्लास : 1800 रुपये (30 डॉलर)
टायटॅनिकशी संबंधित खास बाबी...
1. जहाजावर 13 कपल हनिमून सेलिब्रेशनसाठी हा प्रवास करत होते.
2. टायटॅनिकच्या शिट्टीचा आवाज 11 मैल दूर ऐकली जाऊ शकत होती.
3. टायटॅनिकचे इंजिन चालवण्यासाठी प्रत्येक दिवशी 825 टन कोळसा लागत होता.
4. त्याला बनविण्यासाठी 30 लाखांहून अधिक किलो वजनाचा वापर केला गेला.
5. टायटॅनिकमध्ये चार एलिवेटर्स होते, ज्यात तीन फर्स्ट क्लास आणि एक सेकेंड क्लास होता.
6. 20 नॉट्स (37 किलोमीटर) च्या वेगाने टायट्रॅनिक धावत होते. त्याला जर थांबवायचे असेल तर तेवढ्याच वेगाने त्याला उलटे चालवावे लागायचे. तसे केल्यानंतर ते अर्ध्या मैलवर जाऊन थांबायचे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टायटॅनिकच्या आतील PHOTOS...