आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता इराणने अमेरिकेवर वटारले डोळे, परेडमध्ये दाखवले हे बॅलिस्टिक मिसाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणचे नवे मिसाईल 'खुर्रमशाह'.... - Divya Marathi
इराणचे नवे मिसाईल 'खुर्रमशाह'....
इंटरनॅशनल डेस्क- अणुकरारावरून अमेरिकेसोबत वादावादी सुरू असतानाच इराणने शुक्रवारी एक नवे मिसाईल 'खुर्रमशाह' ची ताकद दाखवली. ज्याची मारक क्षमता दोन हजार किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. इरानने शुक्रवारी संरक्षण आठवड्याची सुरुवातीला आयोजित सैन्य परेड दरम्यान लांब पल्ल्याच्या आपल्या नव्या बॅलिस्टिक मिसाईलचे प्रदर्शन केले. ही परेड दरवर्षी इरान-इराक युद्धाची आठवण म्हणून आयोजित केली जाते. इराणच्या जवळ या रेंजची अनेक मिसाईल्स......
 
- रिवॉल्यूशनरी गार्डने शुक्रवारी याचे अनावरण राजधानी तेहरानमध्ये सैन्य परेड दरम्यान केले. 
- इरानच्या शस्त्रभंडरात मात्र या रेंजची इतर अनेक मिसाईल्स आधीच आहेत. 
- एयरोस्पेस डिवीजनचे शीर्ष कमांडर ब्रिगेडियर जनरल आमिर अली हाजीजादेह यांनी सांगितले की, '2000 किलोमीटर दूर मारक क्षमता असणा-या या बॅलिस्टिक मिसाईलमध्ये अनेक वॉरहेड्स घेऊन जाण्याची क्षमता आहे.'
 - त्यांनी सांगितले की, ' इतर आमच्या मिसाईल्सच्या तुलनेत हे आकाराने छोटा आणि अधिक ताकदीचे आहे. आगामी काळात याचा वापर केला जाईल.' 
- इराणी सशस्त्र दलांनी शुक्रवारी इराकसोबत 1980-88 च्या दरम्यान झालेल्या युद्धाची आठवण म्हणून परेडचे आयोजन केले होते. ज्यात इराणने आपल्या मजबूक क्षमतेच्या सैन्याची ताकद दाखविली. 
- परेडमध्ये आयआरजीसी आणि वॉल्नटिअर मिलीशिया बासीज फोर्सने भाग घेतला. इराणने या दरम्यान देशांतर्गत स्तरावर निर्मित केलेली अन्य अत्याधुनिक मिसाईल्सचे प्रदर्शन केले. ज्यात काहींची क्षमता 1300 किलोमीटर ते 2000 किलोमीटरपर्यंत लांब लक्ष्यभेद करण्याची आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...