Home »International »Bhaskar Gyan» Irma Is Finally Downgraded To Category One

'हार्वे'नंतर US मध्ये 'इर्मा' चक्रीवादळाचा धुमाकूळ; फ्लोरिडात प्रचंड हानी, पाहा PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Sep 11, 2017, 16:44 PM IST

  • अमेरिकेच्या टेक्सास राज्यात आलेल्या 'हार्वे' चक्रीवादळानंतर आता 'इर्मा'ने फ्लोरिडा राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्री 'इर्मा' सुमारे 200 किमीच्या वेगाने फ्लोरिडाच्या दक्षिणी भागावर आदळले.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेच्या टेक्सास राज्यात आलेल्या 'हार्वे' चक्रीवादळानंतर आता 'इर्मा'ने फ्लोरिडा राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्री 'इर्मा' सुमारे 200 किमीच्या वेगाने फ्लोरिडाच्या दक्षिणी भागावर आदळले. या चक्रीवादळात अडकल्याने आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात दोन पोलिस कर्मचा-याचा समावेश आहे. रविवारी रात्री ताम्पा आणि मार्को आयलंडवर तुफानी वादळ धडकले. सोबतच मियामीत चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तर, ब्रिकेलमध्ये महापूर आला. आताही या शहरात जोरदार पाऊस होत आहे. फ्लोरिडा हवामान विभागाच्या माहितीनुसार, आता हे वादळ पश्चिम दिशेकडे वळले आहे. चक्रीवादळाची कॅटेगरी 3 ऐवजी चार केली गेली...
- चक्रीवादळामुळे बहुतेक जोरदार पाऊस पडत आहे. सोबतच सुसाट वारेही वाहत आहे त्यामुळे दहा लाखांहून अधिक घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. लाईटही सर्वत्र गुल झाली आहे.
- फ्लोरिडातील वादळातील भागातील सुमारे 63 लाख लोकांना सुरक्षित स्थानी पोहचवले जात आहे.
- या दरम्यान नॅशनल वेदर सर्विसने 12 तासाच्या अंतरात वादळाची कॅटेगरी 3 वरून कॅटेगरी 4 केली आहे.
- प्यूर्टो रिको आणि अन्य समुद्रकिना-यावरील शहरात अपत्कालीन स्थितीशी दोन हात करण्यासाठी अमेरिकी सेनेचे 7400 जवान आणि इंजिनियर्स तैनात केले आहेत.
- याशिवाय 140 एयरक्रॉफ्ट, 650 ट्रक, 150 नौका तयार ठेवल्या आहेत.
पश्चिमी भागात सर्वात जास्त नुकसानीचा धोका-

- सांगितले जात आहे की, इर्मा वादळ फ्लोरिडातील पश्चिमी भागात सर्वात धोकादायक ठरू शकते.
- राष्ट्रीय वादळ केंद्र (एनएचसी) च्या माहितीनुसार, चक्रीवादळ आता पश्चिम दिशेकडे वळले आहे.
- चक्रीवादळ आणखी शक्तीशाली असल्याने वारा 210 किमी प्रतितास वेगाने धडकत आहे. त्यामुळे मोठे आर्थिक व इतर हानी होऊ शकते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

Next Article

Recommended