आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षाच्या शालेय मुलींवरही बलात्कार, दहशतवाद्यांनी रशियात असा घातला होता धुमाकूळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 सप्टेंबर 2004 रोजी झालेल्या रशियातील बेसलान स्कूल हत्याकांडातील फाईल फोटो.... - Divya Marathi
3 सप्टेंबर 2004 रोजी झालेल्या रशियातील बेसलान स्कूल हत्याकांडातील फाईल फोटो....
इंटरनॅशनल डेस्क- रशियात आजच्याच दिवशी (3 सप्टेंबर) बेसलान स्कूल हत्याकांड घडले होते ज्याला 13 वर्षे झाली. सप्टेंबर 2004 मध्ये रशियातील बेसलान येथे झालेल्या स्कूल अपहरण हत्याकांडात 330 लोकांचा मृत्यू झाला होता.  ज्यात बहुतेक शालेय मुलांचा समावेश होता. ज्यानंतर यूरोपियन मानवाधिकार न्यायालयाने बेसलान स्कूल हत्याकांड थोपवू न शकलेल्या रशियाला जबाबदार धरले होते. शिवाय त्याचवेळी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी धोकादायक हत्यार आणि बेशुद्ध करणारा गॅस वापरल्याबाबत रशियावर आगपाखड केली होती. चेचेन्या दहशतवाद्यांनी केले होते हत्याकांड.....
 
- चेचेन दहशतवाद्यांनी बेसलान स्कूलमधील मुलांसह 1000 हून अधिक लोकांना बंधक केले होते. 
- 2004 मध्ये बेसलानमधील एका स्कूलमध्ये अनेक चेहरा बांधलेल्या महिला आणि स्फोटके बांधलेले पुरुष घुसले व गोळीबार सुरु केला.
- स्कूलमध्ये पोहताच दहशतवाद्यांनी तेथील सुरक्षारक्षकांसह तेथील सर्व पुरुष शिक्षकांना मारून टाकले ज्याला कोणीही विरोध करू शकले नव्हते.
- दहशतवादयांनी बंधक केलेल्या लोकांना स्कूलच्या स्पोर्ट्स हॉलमध्ये ठेवले तर बास्केटबॉल कोर्टवर स्फोटक लावली होती.
- दहशतवादाचा हा प्रकार तीन दिवस चालला होता. रशियन सैनिक तेथे मुले असल्याने कोणतेही आक्रमक कारवाई करू शकले नाही.
- चेचेन दहशतवाद्यांची मागणी होती की, रशिया सरकार चेचेन्यामधून रशियन आर्मीला हटवावे, मात्र रशियाने स्पष्ट नकार दिला होता.
- रशिया सरकारने दहशतवाद्यांच्या समोर न झुकता कमांडो कारवाई करण्याचा आदेश दिला होता. 
- शाळेतील दहशतवाद्यांसह सर्व मुलांना बेशुद्ध करण्यासाठी विषारी वायूचा वापर केला. मात्र याचा परिणाम उलटाच झाला.
- शालेय मुले लहान असल्याने या विषारी वायूने अनेक मुलांचा मृत्यू झाला. याशिवाय शेकडो मुले आर्मी आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीदरम्यान मारले गेले होते.
 
8 वर्षांपर्यतच्या मुलींवर केला होता रेप, यूरीन पिण्यास केले होते मजबूर-
 
- बेसलान नरसंहारला आतापर्यंतचे सर्वात क्रूर नरसंहार मानले जाते. दहशतवाद्यांनी अतियश निर्दयपणे सर्व मर्यादा पार केल्या होत्या.
- अनेक लहान मुलींवर बलात्कार केला होता, ज्यातील काहींचे वय तर 8 वर्षे इतके होते. ज्यांचा ब्लडिंग होऊन तडफडून तडफडून मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी बलात्काराचे व्हिडिओ रिकॉर्डिग सुद्धा केले होते. 
- भूखेने तडफडणा-या मुलांनी जेव्हा पाणी मागितले तेव्हा त्यांनी त्यांना यूरीन पिण्यास भाग पाडले.
 
कोण आहेत चेचेन दहशतवादी-
 
- 1864 मध्ये रशियाचा तत्कालीन शासकने चेचेन्यावर कब्जा केला होता. मात्र, चेचेन्याने कधीही आपल्याला रशियाचा भाग मानले नाही.
- यानंतर रशिया आणि चेचेन दहशतवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला. रशिया नेहमीच शस्त्राच्या जोरावर चेचेन दहशतवाद्यांना दाबत होता.
- चेचेन्या मूळचे उत्तरी काकेशशचे रहिवासी आहेत. ते काकेशक भाषा बोलतात. ते इस्लाम धर्मातील सुन्नी समुदायाचे लोक आहेत.
- चेचेन्याचे एकून क्षेत्रफळ सुमारे 6 हजार वर्ग किलोमीटर आहे. तसेच त्यांची लोकसंख्या 12 लाख 67 हजार आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बेसलान स्कूल हत्याकांडातील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...