आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या हुकुमशहाने पाच लाख लोकांची केली हत्या, मानवी मांस खाण्याचाही होता शौक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युगांडाचा हुकुमशहा आणि राष्ट्राध्यक्ष ईदी अमीन - Divya Marathi
युगांडाचा हुकुमशहा आणि राष्ट्राध्यक्ष ईदी अमीन
इंटरनॅशनल डेस्क- युगांडाचे लष्कर आण् बंडखोर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. या देशाने हुकुमशहा ईदी अमीन याचे पूर्वी क्रूर राजवट पाहिली आहे. अमीनने राष्ट्राध्यक्ष म्हणून सुमारे 8 वर्षे राज्य केले. या दरम्यान लोकांवर त्याने पाशवी अत्याचार केले. त्याच्या राजवटीत त्याने 5 लाखांहून अधिक लोकांना ठार मारले तर हजारो महिलांवर बलात्कार केले. ईदी अमीनबाबत हे ही सांगितले जाते की, त्याला मानवाचे मांस खाण्याचा शौक होता.
- 1966 मध्ये युगांडाचा लष्करप्रमुख राहिलेल्या ईदी अमीनने 1971 साली मिल्टन ओबोटे यांची सत्ता उलटवून देशावर कब्जा केला होता.
- सत्ता ताब्यात घेतल्यावर अमीनने स्वत:ला युगांडाचा राष्ट्राध्यक्ष, सर्व सेना दलाचा प्रमुख कमांडर, आर्मी चीफ ऑफ स्टाफ आणि चीफ ऑफ एयर स्टाफ घोषित केले.
- एवढेच नव्हे तर या क्रूर राष्ट्राध्यक्षाने आणि कट्टर राष्ट्रवादी नेत्याने युगांडातील लांगो आणि अछोली जातीतील लोकांचे सामूदायिक हत्याकांड सुरु केले.
- यामागे त्याचे कारण होते, ओबाटे समर्थकांचा व त्यांच्या जाती समुहाला नाहीसे करणे.
भारतीयांना देश सोडण्याचा आदेश-
- अमीनने 1972 मध्ये आदेश दिले की, ज्या आशियाई लोकांकडे युगांडा देशाची नागरिकता नाही त्यांनी देश सोडून जावे.
- यानंतर सुमारे 60 हजार भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना देश सोडावा लागला होता.
- देशातील कर्मचा-यात आशियाई लोकांचा मोठा वाटा होता. या लोकांनी देश सोडताच तेथील अर्थव्यवस्था कोलमडली होती.
अमीनला असे हटवले-
- 1979 मध्ये जेव्हा टांझानिया आणि अमीन विरोधी युगांडा लष्कराने त्याच्याविरोधात आवाज उठवला तेव्हा अमीनची आठ वर्षाची हुकुमशाही सत्ता संपुष्टात आणली.
- अखेर अमीनला शरण यावे लागले आणि 11 एप्रिल 1979 रोजी युगांडा सोडून पळून जावे लागले.
- यानंतर दोन दिवसातच पूर्वीच्या सरकारने सत्ता ताब्यात घेतली. त्याआधी ऑक्टोब 1978 मध्ये अमीनने टांझानियावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता जो अयशस्वी झाला होता.
- अमीनने देश सोडल्यानंतर तो काही काळ लीबियात शरण आला. नंतर तो सौदी अरबमध्ये स्थायिक झाला. 2003 साली त्याचा मृत्यू झाला.
'मेड मॅन ऑफ अफ्रिका'-
- अमीनला 'मेड मॅन ऑफ अफ्रिका' म्हटले जाते, यामागेही काही कारण आहे.
- अमीन सर्वसामान्यपणे लोकांची हत्या करण्यासाठी शस्त्राचा वापर करत नव्हता.
- त्याने काही लोकांना जिवंत जमिनीत गाढले तर काहींना भुकलेल्या मगरीपुढे सोडून दिले.
- त्याने आपल्या पॅलेसमधील सर्व चांगल्या व सुंदर मुलींवर लैंगिक अत्याचार केले.
- अमीनला माणसांचे मांस खाण्याचा शौक होता, त्याचे पुरावेही मिळाले होते.
- त्याच्या फ्रिजमधून अनेक लोकांचे मांस व डोकी जप्त केली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हुकुमशहा ईदी अमीनचे काही PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...