आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: स्पेनच्या \'ला टोमाटीना\' फेस्टमध्ये तरूणाईचा जल्लोष, काय असतो हा प्रकार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनमधील 'ला टोमाटीना' फेस्टिवल... - Divya Marathi
स्पेनमधील 'ला टोमाटीना' फेस्टिवल...
इंटरनॅशनल डेस्क- स्पेनमध्ये बुधवारी 'ला टोमाटीना' (टोमॅटो फाईट) फेस्टिवलचे सेलिब्रेशन झाले. यंदाच्या या फेस्टिवलमध्ये सुमारे 40 हजार लोक यात सामील झाले होते. टोमॅटो फाईट तेथे खूपच लोकप्रिय फेस्ट आहे. यात साधारणपणे सुमारे 250,000 पाउंड टोमॅटोचा वापर केला जातो. फेस्टच्या काळात स्पेनमधील लोक एक दुस-यांवर टोमॅटो वॉर करतात. लोकांना दुखापत होऊ नये म्हणून टोमॅटो पिकलेली व फोडून मारली जातात. जगभरातील लोक होतात सामील...
 
-  दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी स्पेनमध्ये हा सण, उत्सव पार पडतो.
- या फेस्टिवलमध्ये सामील होण्यासाठी लोक जगभरातील काना-कोप-यातून येतात.
- यात सहभागी होणा-या लोकांची संख्या लाखोंत असल्याने आता तेथे तिकिट सिस्टम सुरु केली आहे.  
- वर्ष 2002 मध्ये याला फेस्टिविटी ऑफ इंटरनॅशनल टूरिस्ट इंटरेस्ट घोषित करण्यात आले होते.  
- हा खेळ लोकप्रिय असल्याने अनेक चित्रपटात दाखविला गेला आहे. 2012 मध्ये आलेली बॉलिवूड फिल्म 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये याचे दृश्य घातले गेले आहे. 
 
अशी झाली सुरुवात- 
 
- याची सुरुवात 1945 मध्ये सुरु झाली जेव्हा काही युवा स्पेन शहरात धरणे-आंदोलन करत होते.  तेव्हा पोलिस त्यांना रोखण्यासाठी पुढे सरसावले.
- तेव्हा त्या युवकांनी जवळच असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानातील टोमॅटो व इतर भाज्या अंगावर टाकून हल्ला केला.
- यात लवचिक टोमॅटो पोलिसांच्या अंगावर फुटली त्यामुळे तेव्हा तेथील आंदोलनकारी युवक आणि नागरिक आनंदी झाले.
- कपडे खराब झाल्याने पोलिस लाजून तेथून निघून गेले. त्यानंतर तेथील नागरिकांत फूड फाईट प्रसिद्ध झाली आणि त्याला स्पेन भाषेत 'ला टोमाटीना' म्हटले गेले व पुढे तर हा उत्सवच होऊन बसला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फेस्टिवलचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...