आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी गर्लफ्रेंडच्या मर्डरचा प्लॅन, मग मारण्यापूर्वी काही क्षण आधी टिपले हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मर्डरच्या आधी काही क्षण जोलीचा टिपलेला हा फोटोज... - Divya Marathi
मर्डरच्या आधी काही क्षण जोलीचा टिपलेला हा फोटोज...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेत एका तरूणाने आधी आपल्या एक्स-गर्लफ्रेंडच्या मृत्यूचे षडयंत्र रचले आणि त्यानंतर तिला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यापूर्वी तिचे फोटोज कॅमे-या कैद केले. त्याची नाराजी फक्त यामुळे होती की, गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत ब्रेकअप केले होते. मात्र, घटनेनंतर दोन वर्षानी या तरूणाला या प्रकरणी 52 वर्षाची शिक्षा सुनावली. इंस्टाग्रामवर शेयर केले होते शेवटचे फोटोज...
 
- ही घटना वर्ष 2015 ची आहे. अलबामा स्टेटच्या लॉरेन बनरने आधी हायकिंगचा प्लॅन बनवला व त्यासाठी त्याने एक्स-गर्लफ्रेंड जोली कॅलनला राजी केले.  
- खरं तर, त्याआधी 18 वर्षाच्या जोलीने लॉरेनसोबत ब्रेकअप केले होते. मात्र, त्याला हे रिलेशनशिप संपवायचे नव्हते. 
- जेव्हा त्याची डाळ शिजत नसल्याचे लक्षात आले तेव्हा लॉरेनने हायकिंगचा प्लॅन बनवला आणि जोलीला एक मित्र या नात्याने सोबत येण्यास सांगितले.  
- दोघे पिन्होटी नॅशनल रिक्रिएशन ट्रेलवर पोहचले. लॉरेनने घरातून निघाल्यापासून तेथे पोहचेपर्यंत चार फोटोज क्लिक केले आणि ते  इंस्टाग्रामवर टाकले सुद्धा. 
- पहिल्या फोटोत जोली लॉरेनच्या डॉगीसमवेत कारमध्ये बसलेली दिसते तर, उर्वरित फोटोज पर्वतावर हायकिंगच्या वेळचे आहेत. 
- शेवटच्या दोन फोटोजमध्ये जोली पर्वताच्या शेंड्यावर उभी दिसत आहे तर हे फोटोज तिच्या बॅकसाईडने घेतलेले दिसत आहेत.  
- फोटो घेतल्यानंतर लॉरेनने पाठीमागून तिच्या डोक्यावर व पाठीवर दोन गोळ्या झाडल्या व तिला खाली दरीत ढकलून दिले.  
- यानंतर त्याने पोलिसांना फोन केला आणि चियाह माउंटेनवर गर्लफ्रेंडचा मर्डर केल्याचे सांगितले. नंतर पोलिसांनी बॅकपॅकसह जोलीची बॉडी मिळाली.
- लॉरेनने या वर्षी जुलै महिन्यात पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. यानंतर कोर्टाने त्याला 52 वर्षाची जेलची शिक्षा सुनावली.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या केसशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...