आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ब्रिटनमध्ये क्रूर दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटानंतर अशी होती स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे २२ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. - Divya Marathi
ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे २२ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
लंडन- ब्रिटनमधील मॅनचेस्टर शहर सोमवारी रात्री दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटाने हादरले. या बॉम्बस्फोटांत 22 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्‍यात आली आहे. त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनवरील वाहतुकही बंद करण्यात आली आहे.
 
ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे २२ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी अरियाना गाणे सादर करत होती. गायिका अरियाना सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला असून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमींसाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
 
स्टेडियमबाहेर पालक करत होते मुलांची प्रतिक्षा-
 
- अरियाना ग्रांडेच्या म्युझिकल कॉन्सर्टला तरुण-तरुणींनी मोठी गर्दी केली होती. स्टेडियमबाहेर बहुतांश लोक आपल्या मुलांना घेण्यासाठी आले होते.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोचे शेवटचे गाणे सुरु होते. तितक्यात स्टेडियमबाहेरच्या तिकीट विंडोजवळ ब्लास्ट झाला. मोठा आवाज ऐकून स्टेडियममधील लोकांची धावपळ उडाली. लोक स्टेडियमबाहेर निघण्यासाठी एक्झिट गेटकडे पळत सुटले. बाहेर प्रतिक्षा करणारे पालकही घाबरले.
पोलिसांनी दिलेली मा‍हिती अशी की, एरिना येथे अमेरिकन सिंगर अरियाना ग्रांडेचा म्युझिकल कॉन्सर्ट सुरु असताना भीषण बॉम्बस्फोट झाले. ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा में यांनी या बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‍वीट करून या हल्लाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
 
ति‍कीट विंडोजवळ झाला बॉम्बस्फोट-
 
- मॅनचेस्टर एरिनामध्ये तिकीट विंडोजवळ स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजून 35 मिनिटाला हा दोन ब्लास्ट झाले. शो समाप्त झाल्यानंतर लोक बाहेर येत होते.
- एरिनाजवळ व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशन आहे. त्याचबरोबर नॅशनल फुटबॉल म्यूजियमही आहे.
- मॅनचेस्टर एरिना हे यूरोपातील सर्वात मोठे इनडोर स्टेडियम आहे. 1995 मध्ये स्टेडियमचे उद्‍घाटन झाले होते. येथे अनेकदा मोठे कॉन्सर्ट आणि कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्‍यात येते.
 
म्युझिकल कॉन्सर्ट टार्गेट-
 
- दहशतवाद्यांनी अमेरिकन पॉप सिंगर अरियाना ग्रांडेच्या कॉन्सर्टला टार्गेट केले. या कार्यक्रमाला 10,000 लोक उपस्थित होते. त्यात तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक होती. सिंगर ग्रांडे सुरक्षित आहे.
- या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याच दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.
दुसरीकडे, पंतप्रधान थेरेसा में यानी इलेक्शन कॅम्पेन थांबवले आहे. आपातकालीन बैठक बोलावली आहे.
- नरेंद्र मोदी यांनी मॅनचेस्टर येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी 'ट्वीट' करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांबाबत संवेदना प्रकट केल्या आहेत.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या स्फोटातील फोटोज....
बातम्या आणखी आहेत...