आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mars In 39 Days? US Company Wins NASA Grant To Try & Reach Red Planet

नवे इंजिन बांधणीचे प्रयत्न; मानव ३९ दिवसांत मंगळावर !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - मानवाला केवळ ३९ दिवसांमध्ये मंगळ ग्रहावर पोहोचवण्यास सक्षम असलेल्या इंजिनची निर्मिती करण्यासाठी नासाने टेक्सासच्या एका कंपनीस १० दशलक्ष अमेरिकन डॉलरचे (सुमारे ६१.९२ कोटी रुपये) अनुदान देऊ केले आहे. वेबस्टरची अ‍ॅड अ‍ॅस्ट्रा रॉकेट नामक ही कंपनी प्लाझ्माच्या मदतीने या इंजिनची निर्मिती करत आहे. यात इंधनाच्या रूपात इलेक्ट्रिकली चार्ज गॅसचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचे रॉकेट कुणीच तयार केले नसल्याचा दावा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रँकलिन चांग डियाज यांनी केला आहे. हा एक प्लाझ्मा रॉकेट असून त्यास द व्हॅरिएबल स्पेसिफिक इंपल्स मॅग्नेटोप्लाझ्मा रॉकेट (वसीमर इंजिन) म्हटले जाते. यामुळे आता मानवाची मंगळाची वारी सुकर होणार असल्याचे चित्र आहे.

२०१३ मध्ये झाली चाचणी
अ‍ॅड अ‍ॅस्ट्रा रॉकेट कंपनीच्या या इंजिनची २०१३ मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा याचा आपल्या भविष्यातील मंगळयान अभियानासाठी उपयोग करणार आहे. नासाने इंजिनसोबतच स्पेसक्राफ्टही तयार करण्याची विनंती या कंपनीस केली आहे. त्यास २०३० पर्यंतचा कालावधी लागू शकतो.