आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक ठिकाण, अंमलीपदार्थांसाठी मारले जातात हजारो लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिकोच्या ड्रग वॉरमध्‍ये आताही एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. - Divya Marathi
मेक्सिकोच्या ड्रग वॉरमध्‍ये आताही एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
इंटरनॅशनल डेस्क- मेक्सिकोमध्‍ये अंमलीपदार्थांच्या युध्‍दात ( ड्रग वॉर ) आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे अंमलपदार्थांचे तस्कारही सरकारला अजिबात घाबरत नाहीत. या देशात कोण, केव्हा व कधी मारला जाईल हे कळत नाही. नुकतेच मेक्सिकोचे अॅटॉर्नी जनरल जॉर्ज गोन्झालेज यांना काही पुरावे मिळाले. ते म्हणताता, मला वाटते, की देशातील बडे अंमलीपदार्थांचे माफिया राफेल कॅरो क्विन्टेरो यांनी पुन्हा हा व्यवसाय सुरु केला आहे. या मालिके अंतर्गत divyamarathi.com सांगणार आहे कसे सुरु झाले व किती भयानक आहे ' मेक्सिकन ड्रग वॉर'. सगळीकडे आहे अंमलीपदार्थांचा व्यवसाय...
 
-  अनेक दशकांपासून पूर्ण मेक्सिको अंमलीपदार्थांच्या जाळ्यात अडकले आहेत. 
- यांच्या तस्करीमुळे अनेक प्रसिध्‍द लोकांचीही हत्या झाली आहे. 
- यात येथील लोकप्रिय गायक वेलेन्टाइन एलिझालडेही सामील आहे. 
- 1 डिसेंबर 2006 च्या अध्‍यक्ष फेलिप कालडेरोनने पदाची सूत्र स्वीकारताना अंमलीपदार्थांविरुध्‍द युध्‍दाची घोषणा केली होती. 
- या युध्‍दात पोलिसांसह लष्‍करालाही सामील करण्‍यात आले. 
- या युध्‍दात प्रत्येक वर्षी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. लष्‍कर व अंमलीपदार्थाचे तस्कर यांच्यामध्‍ये गोळी सुरु असतो. 
- अहवालानुसार, येथे अंमलीपदार्थांचा व्यवसाय 3 लाख 30 हजार कोटी रुपये आहे.
 
अमेरिकेलाही केले उद्ध्‍वस्त-
 
- मेक्सिकोचे माफिया सर्व प्रकारचे अंमलीपदार्थांचा पुरवठा करतात. 
- अमेरिकेच्या गृहमंत्रालयानुसार, कोलंबियात 90 टक्के कोकीनचे उत्पादन होते. 
- हे कोकीन मेक्सिकोमार्गे येतात. 
- अमेरिकेत येणा-या अमंलपदार्थांच्या 70 टक्के मेक्सिकोच्या नियंत्रणात आहे.
 
आतापर्यंत इतके लोक बळी गेले-
 
- 2006 मध्‍ये ड्रग वॉरमध्‍ये 12 हजार 500 लोकांचा जीव गेला. 
- 2007 मध्‍ये 10 हजार लोक मृत्यूमुखी पडले. 
- 2008 मध्‍ये 13 हजार लोकांचा जीव गेला. 
- 2009 मध्‍ये 15 हजार लोकांना अंमलीपदार्थांच्या व्यवसायात बळी गेला आहे. 
- 2010मध्‍ये 20लोकांनी जगाचा निरोप घेतला. 
- 2011 मध्‍ये 22 हजार लोक मृत्यूमुखी पडले. 
- 2012 मध्‍ये 12 हजार लोकांनी जीव गमावला. 
- 2013 मध्‍ये 18 हजार लोक बळी गेले. 
- 2014 मध्‍ये 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी अंमलीपदार्थांच्या पायी जीव गेला.
- 2015 मध्ये 14 हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
- 2016 ची आकडेवारी अजून उपलब्ध झाली नाही.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, ड्रग वॉरचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...