आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड फोटोग्राफी डे : फोटो इतके सुंदर की आपला डोळ्यावर विश्वासच बसू नये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अथेन्सचे फोटोग्राफर दिमित्रा स्टॅसिनोपोपुलु यांनी चीनमधील युन्नान प्रांतातील लिजांग येथे टिपलेला फोटो... - Divya Marathi
अथेन्सचे फोटोग्राफर दिमित्रा स्टॅसिनोपोपुलु यांनी चीनमधील युन्नान प्रांतातील लिजांग येथे टिपलेला फोटो...
इंटरनॅशनल डेस्क- 19 ऑगस्ट वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे. 2010 मध्ये याची सुरुवात झाली. याची सुरुवात यासाठी करण्यात आली जेणेकरून फोटोग्राफ्सद्वारे कम्युनिटीवर सकारात्मक प्रभाव पडावा. या खास दिवसानिमित्त आज आम्ही जगातील वेगवेगळ्या भागातील जबरदस्त फोटोज दाखविणार आहोत. हे फोटो सुंदर, कलरफुल आणि परफेक्ट टाईमला क्लिक केले आहेत त्यामुळे वाटते की हे फोटो फोटोशॉपच्या मदतीने तयार केले आहेत. मात्र ते वास्तवात खरे फोटो असून कॅमे-याने टिपले आहेत. फोटोग्राफरच्या प्रतिभेचा नमूनाच जणू...
 
-वर दिसत असलेला फोटो चीनमधील युन्नान प्रांतातील लिजांग शहरातील आहे आणि फोटोग्राफर आहे अथेन्सचा 1953 मध्ये जन्मलेला दिमित्रा स्टॅसिनोपोपुलु. बॅंकिंग सेक्टरमध्ये सुमारे 20 वर्षे काम केल्यानंतर त्याने 1994 राजीनामा दिला आणि रोमानियात फॅमिली बिजनेस संभाळू लागला. 2005 मध्ये त्याचे पहिले पुस्तक रोमानिया ऑफ माय हार्ट पब्लिश झाले होते. यानंतर तो दूर दूर देशांत भटकू लागला व तेथील नितांत सुदंर सौंदर्य आपल्या कॅमे-याने टिपू लागला. त्याची भारत, भूतानन, म्यानमार, चीन आदी देशांवर पुस्तके आली आहेत.
 
काय आहे वर्ल्ड फोटोग्राफी डे?
 
-दरवर्षी 19 ऑगस्टला तो साजरा केला जातो. याचा विचार 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर कोर्स्के आराच्या मनात आला. त्याच्या डोक्यात असा विचार आला की, फोटोग्राफी जगात सकारात्मक बदल घडवू शकते. यासाठी त्याने जगातील फोटोग्राफर्सना एकत्र आणण्यासाठी या इव्हेंटला जन्म दिला. 
-याची सुरुवात 2010 पासून सुरू झाली. त्या वर्षी फक्त यात 250 फोटोग्राफर जोडले गेले. गेल्या वर्षी जागतिक स्तरावर 50 कोटींहून अधिक लोकांनी या इव्हेंटचे फोटोज वेब, प्रिंट आदी विभिन्न माध्यमातून पाहिले होते. 
- या इव्हेंटसाठी 19 ऑगस्ट ही तारीख यासाठी निवडली कारण 1937 मध्ये याच दिवशी डेग्युइरेटाईप नावाच्या फोटोग्राफिक प्रॉसीजरचा आविष्कार जन्माला आला होता. ही प्रॉसीजर जोसफ नीसेफर आणि डेग्युइरे नावाच्या दोन फोटोग्राफर्सनी बनवली होती.
- योगायोगाने 2 वर्षानंतर 1939 मध्येच 19 ऑगस्ट रोजी फ्रान्स सरकारने याचे पेटेंट अधिकार खरेदी केल्यानंतर या प्रॉसीजरचे पेटेंट जगासाठी मुक्त केले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काही शानदार फोटोज...
बातम्या आणखी आहेत...