आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasa Astronaut Posts Photos Of The First Flower Grown In Space

नासाच्या शास्त्रज्ञांची कमाल, अंतराळात फुलवले पहिले फुल जिनिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्यांदाच : स्पेस फ्लावर जिनिया. - Divya Marathi
पहिल्यांदाच : स्पेस फ्लावर जिनिया.
शास्त्रज्ञांना प्रथमच पृथ्‍वीच्या बाहेर फुल फुलवण्‍यास यश मिळाले आहे. इंटरनॅशनल स्पेस सेंटरच्या (आयएसएस) वेजी प्रयोगशाळेत पहिल्यांदाच एडिबल जिनिया नावाचे रोप उगवण्‍यात आले आहे. त्यास फुल आल्यानंतर अंतराळवीर स्कॉट केलीने तिची छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट केली आहेत. भविष्‍यातील अंतराळ मोहिमा आणि मंगळावरील मानवी वसाहत वसवण्‍याच्या दिशेने मोठे यश असल्याचे मानले जात आहे.
एकवेळ अशी आली होती, की रोप सुकायला लागले...
एकवेळ अशी आली होती, की जेव्हा एडिबल जिनियाचं हे रोपट सुकू लागले होते. त्याच्या आतील पाणी पानातून बाहेर यायला लागले होते. पाने गळू लागली होती, जे रोप जळून जाण्‍याचे पहिले लक्षण होते. त्यापासून बचाव व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी पंखांनी हवा घातली. यास यश मिळाले आणि अंतराळात पहिल्यांदा फुल फुलवण्‍यास यश मिळाले. त्याचे पहिले छायाचित्र आयएसएसमधील स्कॉट केलीने जारी केले आहे. केली मार्च 2016 मध्‍ये पृथ्‍वीवर परतणार आहे.
सलाड आहे या रोपाचे फुल
एडिबल जीनिया नावाचे हे रोपट वेजी प्रयोगशाळेत उगवण्‍यात आले. हे रोपट आणि तिचे फुल सलाड म्हणून खाल्ली जातात. मात्र ती उगवणे बरेच अवघड आहे. कारण हे रोप प्रकाश आणि वातावरणाच्या बाबतीत अधिक संवेदनशील आहे. त्यास उगवण्‍यासाठी जवळजवळ 60 ते 80 दिवसांचा कालावधी लागतो.
तयारी
2018 मध्‍ये आयएसएसमध्‍ये टोमॅटोंचे पिक घेतले जाईल. त्यापूर्वी इतर पाल्याभाज्या आणि पिके घेण्‍याची तयारी चालू आहे.
वेजी प्रयोगशाळा (लॅब)म्हणजे काय?
अंतराळतील प्रवाशांना ताज्या भाज्या मिळू शकेल, यासाठी आयएसएसमध्‍ये मे 2014 रोजी वेजी प्रयोगशाळा बनवण्‍यात आली. ते एका डब्ब्याप्रमाणे आहे. त्याचे वजन 7.2 किलोग्रॅम आहे. प्रयोगशाळा क्रियाशील राहावी म्हणून 115 वॅट ऊर्जेची गरज असते. शून्य गुरुत्वाकर्षणात त्यात 45 सेमी उंचीपर्यंत पिक येऊ शकते. सध्‍या फक्त सलाडवाली भाजी लावली जाते.