आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशेल नव्हे, ही महिला होती ओबामांचे पहिले प्रेम, समोर आली लव्ह स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बराक ओबामांचे पहिले प्रेम असलेली शैला मियोशी जॅगर (डावीकडे) आणि बराक ओबामा... - Divya Marathi
बराक ओबामांचे पहिले प्रेम असलेली शैला मियोशी जॅगर (डावीकडे) आणि बराक ओबामा...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या जीवनावर लिहलेल्या एका पुस्तकात त्यांच्या पहिल्या प्रेमाबाबत सत्य समोर आले आहे. या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे की, ओबामांचे पहिले प्रेम त्यांची पत्नी मिशेल नव्हती. मिशेलच्या आधी त्यांचे एक श्वेतवर्णीय तरूणी शैला मियोशी जॅगरसोबत अफेयर होते. या दरम्यान ओबामांनी शैलाला लग्नासाठी प्रपोज सुद्धा केले होते. एक वर्षाहून अधिक काळ होते रिलेशनमध्ये...
 
- पुलित्जर पुरस्कार विजेता आणि लेखक डेविड जे. गॅरो यांनी आपल्या 'रायजिंग स्टार' या ओबामांवर लिहलेल्या पुस्तकात त्यांच्या नव्या लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे.  
- गॅरोने लिहले आहे की, मिशेलची भेट होण्याआधी काही वर्षे आधी ओबामा शिकागोत राहणा-या शैला नावाच्या तरूणीच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी शैला 23 तर ओबामा 25 वर्षाचे होते. 
- ओबामा, शैलासोबत लग्न करू इच्छित होते. त्यासाठी ओबामांनी शैलाला दोनदा लग्नासाठी प्रपोज केले होते. लग्नाच्या बोलणीसाठी दोघांचे कुटुंबियही भेटले होते.
- मात्र, शैलाच्या कुटुंबियांनी शैलाचे 23 हे वय लग्नासाठी कमी असल्याचे सांगितले होते.
 
असे तुटले नाते- 
 
- गॅरोंच्या माहितीनुसार, शैलाने त्यांना सांगितले की, दोघांचे नाते तुटण्यास ओबामांचे राजकीय महत्वाकांक्षा कारणीभूत ठरली.
- तो असा काळ होता, जेव्हा अफ्रिकी-अमेरिकन नेता आपल्या गो-या पत्नींना राजकारणातील मोठा अडसर मानायचे. 
- याचमुळे राजकीय महत्त्वकांक्षा ठेऊन असलेल्या ओबामांनी शैलाला आपल्या समुदायासमोर कधीही घेऊन जायचे नाहीत.
- ओबामांच्या एका मित्रांच्या म्हणण्यानुसार, या मुद्यांवरून दोघांत नेहमी वाद व्हायचे. पुढे यातूनच त्यांचे ब्रेकअपही झाले.
- मात्र, या घटनेनंतर ओबामा आपल्या पुढील शिक्षणासाठी हावर्ड लॉ स्कूल येथे गेले तर शैला दक्षिण कोरियात एका संशोधनासाठी सियोल येथे गेली.  
- या दरम्यान ओबामांनी शैलाला पुन्हा एकदा लग्नासाठी प्रपोज केले. मात्र, शैला यासाठी तयार नव्हती. अशा पद्धतीने त्यांचे नाते संपुष्टात आले.
 
पुन्हा झाली भेट- 
 
- ब्रेकअपनंतर 1990-91 मध्ये शैला जेव्हा हॉवर्डमध्ये शिक्षण म्हणून रूजू झाली तेव्हा दोघांची भेट तेथे झाली. 
- मात्र, त्या भेटीच्या आधीच ओबामांच्या आयुष्यात मिशेल आली होती. पुढे याच मिशेलसोबत ओबामांनी लग्न केले.
- गॅरोच्या माहितीनुसार, पेशाने एक प्रोफेसर असलेल्या शैलाने फिलॉसफीत पीएचडी केली आहे. सध्या ती ओहियोतील ओबर्लिन कॉलेजमध्ये शिकवते. तिने कोरिया आणि कोरिया युद्धाशी संबंधित तीन पुस्तके लिहली आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...