आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या डी-3 उपकरणाने कॅन्सरचे होणार लवकर निदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - स्मार्टफोनच्या माध्‍यमातून चालेल असे एक नवीन उपकरण बनवण्‍यात आले आहे.याच्या साहाय्याने डॉक्टर कॅन्सरचे निदान खूप लवकर करु शकतात. उपकरण मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पीटलच्या(एमजीएच) संशोधकांनी विकसित केले आहे.त्या डी-3 (डिजिटल डिफ्रॅक्शन डायग्नॉसिस) असे नाव देण्‍यात आले आहे. बॅटरीच्या साहाय्याने चालणा-या एलईडी प्रकाशाने युक्त या इमॅजिंग उपकरणास कोणत्याही स्मार्टफोनने जोडले जाऊ शकते.तसेच त्याच्या कॅमे-याने हाय फ्रिक्वेन्सीचे इमॅजिंग डाटा रेकॉर्ड करण्‍यात येऊ शकतो. पारंपरिक मायक्रोस्कोपीऐवजी नवी डी-3 प्रणालीच्या माध्‍यमातून रक्‍त किंवा टिशूतील एक लाखापेक्षा जास्त पेशींची चिकित्सा केली जाऊ शकते.