आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईतील मानवनिर्मित पाम बेटाची सहा वर्षांत निर्मिती, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईमध्ये मुख्य किनाऱ्यावरून 4 किमी अंतरावर असलेल्या अरब खाडीमध्ये मानवनिर्मित पाम बेट तयार करण्यासाठी 2001 मध्ये बेल्जियमच्या कंपनीस काम सोपवले होते. 2006 मध्ये ते पूर्ण करण्यात आले. मोठ्या अवजड मशीनद्वारे समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याची ही अद्ययावत पद्धती होती. किमी लांबीच्या परिसरात काम करत असताना पाम ट्रीच्या आकारात दोन बेटे एकमेकांस जोडली गेली. या प्रकल्पात 21 कोटी घन मीटर दगड, रेती आणि चुन्याचे दगड वापरण्यात आले होते. यात 9.4 कोटी घन मीटर रेती दुबईहून सहा समुद्री मैल दूर समुद्राच्या खोलवर तळातून आणली गेली होती.
दुबईच्या प्रिन्सच्या आदेशावरून पर्यावरणाचे हित लक्षात घेता पाम बेटावर काँक्रीट आणि लोखंडाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. आता हे बेट दुबईतील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक बनले आहे. दुबईच्या तेल उत्पादनात घट आल्याने या नुकसानीची भरपाई पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

पुढे पाहा पाम बेटाची काही छायाचित्रे...