आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागासाकी नव्हे जपानच्या या शहरावर टाकायचा होता अमेरिकेला दुसरा अणुबॉम्ब पण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर लोक असे जळले होते... - Divya Marathi
नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर लोक असे जळले होते...
इंटरनॅशनल डेस्क - 9 ऑगस्ट 1945 च्या सकाळी अमेरिकन फायटर विमानाने दुसरा अणुबॉम्बचा हल्ला जपानच्या नागासाकीवर केला होता. त्यावेळी या औद्योगिक शहरात 600 चिनी व 10 हजार कोरियनसह 2.63 लाख लोक होते. 6 ऑगस्टच्या सकाळी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकल्यानंतर दुस-या हल्ल्याचे नियोजन पाच दिवसानंतर केले होते. कारण हवामान खराब होते. या व्यतिरिक्त व्यूहरचना बदलली गेली व निश्‍चित केलेल्या वेळेपूर्वी नागासाकीवर बॉम्ब टाकले गेले. नागासाकी टार्गेट नव्हतेच...
 
- मात्र नागासाकी अमेरिकेच्या निशाण्‍यावर नव्हतेच. 5 दिवसानंतरच्या नियोजनानुसार कोकुरा शहर त्यांचे लक्ष्‍य होते.
- मात्र शेवटच्या क्षणी अचानक नियोजनात बदल करण्‍यात आले व नागासाकीला लक्ष्‍य करण्‍यात आले.
- हे युध्‍द अमेरिका व ब्रिटनविरुध्‍द जपान असे होते. मात्र नंतर चीन व सोविएत रशियानेही उडी घेतली.
- असे काढले कारण त्यावेळी जपान प्रती जगाचा दृष्‍टीकोन वेगळा होता. या देशाने सप्टेंबर 1931 मध्‍ये चीनचा मोठा भाग असलेल्या मांचुरियावर कब्जा मिळवला होता.
 
जपानी सैन्यावर बॉम्बचे वर्षाव-
 
- हा भाग रशियाच्या सीमेजवळ आहे. सोविएत रशियाचे नेते जपानच्या या कृतीमुळे खूप घाबरले होते.
- कारण त्यांना शंका होती की जर येथे जपानी सैन्याने कब्जा केला तर त्याच्यासाठी अवघड होऊ बसेल.
- या कारणामुळे चीन व सोविएत रशियाही या देशावर नाराज होते. ते जपानविरोधात एकत्र आले व त्यांनी नवीन आघाडी सुरु केली.
- 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिका, ब्रिटन आणि चीनने सोविएत रशियामधून जपानी सैन्यावर हल्ला करण्‍यासाठी विनंती केली.
- यानंतर सोविएत रशियापासून फायटर विमानाने मांचुरिया प्रदेशातून जपानी सैन्यावर हवाई हल्ले करुन बॉम्ब वर्षाव सुरु केला होता.
 
जपान पार कोसळला-
 
- शेवटी जपानला मागे हटावे लागले. कारण हा देश आपल्या दोन शहरांवरील अणुबॉम्ब हल्ल्यांपूर्वी पूर्णपणे कोसळला होता.
- त्यावेळी जपानचे सैन्य दुस-या देशाशी युध्‍द करण्‍याच्या मनस्थितीत नव्हता. जपान सरकारने सर्वप्रथम आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्‍यावर जास्त भर दिला.
- नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर 6 दिवस विचारविनिमय करुन जपानने 15 ऑगस्ट रोजी युध्‍द शरणागतीची घोषणा केली.
- 2 सप्टेंबर रोजी दुसरे महायुध्‍द संपले. तत्पूर्वी युरोपमध्‍ये नाझी सैन्याने समर्पण केले होते.
 
पुढील स्लाईड्सद्वारे पाहा, अणुबॉम्बने उद्ध्‍वस्त झालेला जपान...
बातम्या आणखी आहेत...