आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रायवरने झोपेत चढवली दुस-या कारवर आपली कार, PHOTOS झाले वायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कॉटलँडमधील किर्ककेडली रेल्वे स्टेशनच्या कार पार्किगमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. - Divya Marathi
स्कॉटलँडमधील किर्ककेडली रेल्वे स्टेशनच्या कार पार्किगमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.
इंटरनॅशनल डेस्क- स्कॉटलँडमधील किर्ककेडली रेल्वे स्टेशनच्या कार पार्किगमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील पार्किंगमध्ये एका रात्री उशिरा एका ड्रायवरने आपली माजदा कार रिवर्स घेताना दुस-या कारवर चढवली. या घटनेनंतर तेथून ड्रायवर पळून गेला. मात्र, यातील दुस-या कारच्या ड्रायवरने केस दाखल केली आहे. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, माजदा कारचा ड्रायवर झोपेत होता. या दरम्यान त्याने कार रिवर्स घेताना मागे उभी असलेल्या कारवर त्याची कार चढवली.
 
असे असले तरी, आतापर्यंत ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती समोर आली नाही. ड्रायवरनेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, आता ड्रायवरला मोठा दंड ठोठावला गेला आहे. सकाळी काही लोकांनी या घटनेतील फोटोज सोशल मीडियात शेयर केले, जे आता वायरल होत आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...