आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी असेल जगातील सर्वात हायटेक सिटी, 2700 अब्ज रुपये होणार खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुसेलमधील मरीना ड्रिस्ट्रिक्टमध्ये तयार होत असलेले हॉटेल... - Divya Marathi
लुसेलमधील मरीना ड्रिस्ट्रिक्टमध्ये तयार होत असलेले हॉटेल...
इंटरनॅशनल डेस्क- 21 व्या शतकातील सर्वात हायटेक शहर कसे असावे? हे सांगण्यासाठी कतारमधील लुसेल शहराचे उदाहरण उत्तम ठरेल. हे शहर फिफा वर्ल्ड कपसाठी सध्या डेवलप केले जात आहे. येथे स्टेडियम, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल आणि लोकांच्या राहण्यास घरापासून सर्व काही आहे. हा प्रोजेक्ट सुमारे 2700 अब्ज रुपयांचा आहे. वाळवंट आणि समुद्रजवळ वसवलेय जातेय हे शहर...
 
- या प्रोजेक्टवर कतार सरकार आणि अनेक कंस्ट्रक्शन कंपन्या काम करत आहेत. हे 2019 पर्यंत तयार असेल. 
- 2700 अब्ज खर्चाच्या या शहरात 2022 चा फिफा वर्ल्डकपचा फायनल मॅच होईल. 
- 38 स्क्वेयर किमी क्षेत्रपळात वसवले जात असलेल्या या शहरात स्टेडियम, आयलंड्स, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल, जू आणि गोल्फ कोर्सपर्यंत सर्व काही असेल.
- शहरात सुमारे 250,000 लोकांच्या राहण्याची व्यवस्था असेल. यासाठी अपार्टमेंट्स बनवले जात आहे.  
- राजधानी दोहापासून 23 किमी दूर हे शहर समुद्रस्थळी आणि वाळवंटात वसवले जात आहे, जे सर्वात आव्हानात्मक काम आहे.
 
ही आहेत शहराची खास वैशिष्ट्ये- 
 
- लुसेलमध्ये इलेक्ट्रिक इक्विपमेंट्सपासून ट्रॅफिक सिस्टिमपर्यंत सर्व काही कॉम्यूटराईज्ड असेल.  
- टूरिस्ट्स लुसेलपर्यंत पोहचण्यासाठी लाईट ट्रेन, वॉटर टॅक्सी सिस्टिम आणि अंडरग्राउंड पॅसेजचा वापर करू शकतात. जे लोक पायी चालणे पसंत करतील त्यांच्यासाठी अंडरग्राऊंड पॅसेल असेल. 
- ट्रॅफिकची व्यवस्था स्मार्ट सिटी सारखी असेल. येथे गरज पडल्यास ट्रॅफिक आपोआप डायवर्ट होईल. 
- एवढेच नव्हे तर सिक्युरिटीच्या दृष्टीने रस्त्यावर कोप-या कोप-यात कॅमेरे लावलेले असतील आणि प्रत्येकावर नजर ठेवतील.
- पर्यावरणाला नुकसान पोहचू नये यासाठी सोलर पॅनेल लावले गेले आहेत. त्यामुळे वीजेचा खर्च कमी होईल.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोजमधून कसे दिसते हे शहर...
बातम्या आणखी आहेत...