आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा रियल लाईफ मोगलीला, हिंस्त्र प्राण्यांसमवेत अफ्रिकन जंगलात राहिली 10 वर्षे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीच ती रियल लाईफ मोगली टिप्पी बेंजामिन ओकांती डेग्रे.... - Divya Marathi
हीच ती रियल लाईफ मोगली टिप्पी बेंजामिन ओकांती डेग्रे....
इंटरनॅशनल डेस्क- हे फोटोज अफ्रिकेत राहिलेल्या एका अशा मुलीचे आहेत, जिने 10 वर्षे जंगलात घालवली. तिला जगभरात रियल लाईफ मोगली म्हटले जाते. टिप्पी नावाची ही मुलगी आज 26 वर्षाची आहे आणि ती फ्रान्समध्ये राहत आहे. काय आहे टिप्पीची कहाणी...
- दोन वर्षापूर्वी टिप्पी बेंजामिन ओकांती डेग्रे हिचे लहानपणीचे फोटोज वायरल झाले होते. तिच्या आई-वडिलांनी हे समोर आणले होते.
- हे सर्व फोटोज 'माय बुक ऑफ अफ्रिका' मध्ये सामील आहेत. यात ती थेट हत्तीपासून ते सिंहापर्यंत जंगली जनावरांच्यासोबत खेळताना दिसत आहे.
- जंगलात राहणारा पाच टनाचा हत्ती टिप्पीसाठी भाऊ बनला होता. तर बिबट्या तिचा बेस्ट फ्रेंड होता.
- तेथे ती प्राण्यांसमवेत खेळायची आणि आदिवासी लोकांसारखे कपडे घालून शिकार करायला शिकायची.
- सिंहाला घाबरविण्यासाठी आणि त्याच्याशी मैत्री करण्याची क्षमता ठेवणारी टिप्पी शहामृगची सवारी करायची.
काय बनली मोगली?
- नामिबियात जन्मलेली टिप्पीचे पेरेंट्स सिल्वी रॉबर्ट आणि अॅलन डिग्री वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते.
- टिप्पीचे नाव त्यांनी प्रसिद्ध अॅक्ट्रेस टिप्पी हेड्रेनच्या नावावरून ठेवले होते. जिच्याजवळ एक पाळीव सिंह होता.
- तिने आपल्या पेरेंट्ससमवेत अफ्रिकेच्या जंगल सफारीदरम्यान अनेक वर्षे घालविले. हे सर्व फोटोज त्याच ट्रिपदरम्यानचे आहेत.
- या दरम्यान तिने बोत्सवाना, झिंम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेसह अनेक देशांत प्रवास केला.
नागरी वातावरणात आल्या अडचणी-
- 10 वर्षे जंगलात राहिल्यानंतर टिप्पीला फ्रेंच स्टेट स्कूलमध्ये घालण्यात आले.
- मात्र, टिप्पीचे बालपण जंगलात गेल्यानंतर तिला शहरी व नागरी वातावरणात अडजेस्ट करताना अनेक अडचणी आल्या.
- ती इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी होती. त्यामुळे तिला शालेय शिक्षण घेताना त्रास झाला.
- दोन वर्षानंतर तिची प्रगती पाहून पालकांनी तिला घरीच शिक्षण देणे सुरु केले.
- 23 व्या वर्षी टिप्पीने चित्रपट अभ्यासक्रम पूर्ण केला. तिने टिप्पी ऑफ अफ्रिका नावाचे बेस्टसेलिंग बुक सुद्धा लिहले.
- टिप्पीच्या फ्रेंड्सच्या माहितीनुसार, ती स्वत:ला अफ्रिकन मानते आणि तिला नामिबियाचा पासपोर्ट हवा आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रियल लाईफ मोगलीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...