Home »International »Bhaskar Gyan» Revenge Of 9/11, How Amrica Killed Osama Bin Laden In Pakistan

9/11: ट्विन्स टॉवर्स हल्ल्याचा अमेरिकेने असा घेतला बदला, वाचा संपूर्ण स्टोरी....

दिव्यमराठी वेब टीम | Sep 11, 2017, 14:01 PM IST

  • लादेनचा आधीचा फोटो (डाव्या बाजूला) आणि मृत्यू नंतरच्या फोटो (उजव्या बाजूला).
इंटरनॅशनल डेस्क- 9/11 या हल्ल्याने अमेरिकेसोबतच संपूर्ण जग हादरले होते. त्या दिवशी अनेकांना दहशतवादाचे रौद्ररूप दिसले. या संपूर्ण घटनेचा सुत्रधार असलेला ओसामा बीन लादेन याचे नाव जगभरात वाऱ्यासारखे पसरले. त्यापूर्वी हे नाव फार कोणाला माहित असण्याचे कारण नव्हते. मात्र 9/11 च्या घटनेनंतर ते नाव मोठ्यांपासून लहानग्यांच्या ओठांवर आले. लादेनचे हे कृत्य माणूसकीला काळीमा फासणारे होते. तसेच अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला होता. त्यामुळे अमेरिकन लष्कराने लादेनचा कसून शोध सुरू केला आणि तब्बल दहा वर्षांनंतर अमेरिकेच्या लष्कराने ओसामाबिन लादेनला ठार केल्याची बातमी आली. 2 मे 2011 ला ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्याचे वृत्त जगासमोर आले. तेव्हा अमेरिकेची क्षमता आणि इच्छाशक्ती सिद्ध झाली. अमेरिकेवर हल्ला झाल्याला आज 16 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय लादेनच्या खात्म्याची स्टोरी....
हे संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी यशस्वीरीत्या पार पाडले होते. या कमांडोंच्या तुकडीत असलेल्या टॉमने (बदललेले नाव) सांगितले, की हाच तो लादेन, ज्याला आपण शोधत होतो.' टॉमच्या सहकाऱ्याला तर खात्री होतीच. मात्र मारला गेलेला तो इसम जगातील सर्वात धोकादायक आणि क्रूरकर्मा आतंकवादी लादेनच आहे का? याची कदाचित टॉमला पूर्णपणे खात्री करायची होती. कारण फोटो आणि मारला गेलेला लादेन यात आकाश-पाताळाची तफावत होती. मारला गेलेला लादेन हा कमालीचा तरूण दिसत होता. मात्र तेथे सापडलेल्या एका गोष्टीने या रहस्यावरील पडदा दूर झाला. लादेन केस काळे करण्यासाठी डाय करायचा. यामुळे तो साधारणपणे 10 वर्षांनी लहान वाटत होता.
या गोष्टीचा खुलासा माजी नेव्ही सील टीमच्या अशा एका सदस्याने केला आहे. ज्याचे पुस्तक 'नो इझी डे- द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नेव्ही सील' हे अमेरिका सरकारची डोकेदुखी ठरले. या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या नेव्ही सील कमांडोच्या या पुस्तकात केवळ लादेनशी संबंधित खुलासेच नाही तर, लादेनला मारण्यासाठी कशा प्रकारची रणनिती आखली होती आणि कसे नियोजन केले गेले, याचे सविस्तर वर्णन आहे.
अमेरिकेवर झालेल्या या आतंकवादी हल्ल्याच्या मागे, क्रूर दहशतवादी लादेनचाच हात होता. अमेरिकेने त्या घटनेचा बदला घेत लादेनला पाकिस्तानातच कंठस्नान घातले. आम्ही आपल्याला त्या रात्रीची सविस्तर कहाणी सांगत आहोत. ज्या रात्री ओसामाला नेव्ही सीलने पाकिस्तानमध्ये संपवले.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लादेनच्या खात्म्याची रहस्यमय कहाणी...
असे संपवले होते अमेरिकेच्या क्रमांक एकच्या शत्रूला...
घरात घुसून डोक्यात घातल्या होत्या गोळ्या....

Next Article

Recommended