आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियाचे सीरियात हवाई बॉम्बहल्ले सुरुच, पाहा, लहान मुलांची कशी झाली अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियातील अलेप्पो शहरातील फरदौस बाजारात रशियाने हल्ला केला, तेव्हा तेथे महिला व मुलांचा समावेश होता जे जखमी झाले आहेत व अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. - Divya Marathi
सीरियातील अलेप्पो शहरातील फरदौस बाजारात रशियाने हल्ला केला, तेव्हा तेथे महिला व मुलांचा समावेश होता जे जखमी झाले आहेत व अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत.
अलेप्‍पो- दहशतवादी संघटना आयएसआयएसला संपविण्याच्या नावाखाली रशिया आता सीरियात राजरोस हल्ले करत आहे. आता हेच हल्ले तेथील सामान्य नागरिकांसाठी मृत्यूचे अड्डे बनले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रशियाकडून सातत्याने तेथे बॉम्बस्फोटाचे हल्ले केले जात आहेत. त्यात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. मंगळवार व बुधवारी पुन्हा एकदा रशियाने अलेप्‍पो शहरातील विविध ठिकाणी हल्ले केले. या घटनेला सीरिया स्थित ब्रिटनच्या एका मानवाधिकार संघटनेने दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात किमान 50 लोक मारले गेले आहेत. ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे. अजूनही अनेक लोक बिल्डिंगच्या मलब्यात अडकले आहेत. रशियाने बुधवारी 25 हवाई हल्ले केले....
- रशियाकडून करण्यात आलेल्याअनेक हवाई हल्ल्यात अलेप्‍पो स्थित बुस्‍तन अल-कसर, जकारिया मलहिफजी भागात बॉम्बस्फोट घडविले.
- बुधवारी 25 हवाई हल्ले केले गेले ज्यात शहरातील नागरी भागावर निशाणा साधला.
- अलेप्पो शहरावर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी सीरियाई सरकारी सेना रशियाच्या मदतीने प्रयत्न करत आहे.
- सीरियातील नागरिक सुरक्षा समूह कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा फरदौस बाजारात हल्ला झाला तेव्हा तेथे महिला व मुलांचा समावेश आहे.
- अजूनही अनेक लोक मलब्याखाली अडकले आहेत. मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. तसेट मतदेह बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.
- या स्फोटात सर्वात जास्त लहान मुलांना फटका बसत आहे. रशियाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लोक उपाशीपोटीच तळघरात लपून बसले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सीरियातील उद्धवस्त झालेले अलेप्पो शहरातील PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...