आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे नोकरी देणारी \'JOB QUEEN\', नोकरीहून काढणा-या बॉसचे मानते आभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारिना रूसो यांना जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. - Divya Marathi
सारिना रूसो यांना जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
इंटरनॅशनल डेस्क-  तिला एका आठवड्यात दोनदा नोकरीवरून काढले. एकदा तर बॉसने तिला लंचवरून येण्यास पाच मिनिटे उशीर झाला म्हणून काढून टाकले. अशा अनेक नोकऱ्या गमावल्यानंतरही तिने हार मानली नाही. तिने टायपिंग स्कूल सुरू केले. आज ती एका कंपनीची मालक आहे. युवकांना रोजगार शोधून देण्यासाठी ही कंपनी मदत करते. ती आज ऑस्ट्रेलियातील सर्वश्रीमंत महिला असून कंपनीची उलाढाल 6 अब्ज 67 कोटींची आहे. 
 
सारिना रुसो आज 67 वर्षांच्या आहेत. युवा पिढी तिला नोकरी देणारी राणी, असे संबोधतात. सारिना आपल्या या यशाचे श्रेय आपल्याला आलेल्या अपयशांनाच देते. नोकरीवरून काढणाऱ्या आपल्या अनेक बॉसचेही ती आभार मानते. यामुळेच ती स्वत:चे स्कूल उघडू शकली. सारिनाने ‘मीट मी अॅट द टॉप’ या पुस्तकात या सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. उधार पैसे घेऊन सारिनाने शिक्षण घेतले याची आठवणही ती सांगते.
 
कंपनीत 1 हजाराहून अधिक कर्मचारी-
 
- केवळ 9 मुलांना घेऊन 1979 मध्ये सुरू केलेल्या सारिनाच्या या कंपनीत आज 1 हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात. 
- भारत, व्हिएतनाम, चीन इत्यादी देशांत कंपनीची व्याप्ती आहे. हा कंपनी समूह रुसो जॉब अॅक्सेस, रुसो रिक्रूटमेंट, रुसो कार्पोरेट ट्रेनिंग, हायर एज्युकेशन अशा क्षेत्रात कार्यरत आहे.
- सारिना सांगतात की, आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे नोकरी करावी लागत होती. कमी वयातही मी नोकरी पत्करली. 
- मी सलग आठवडाभर काम करत होते. परंतु, यात माझे मन रमत नव्हते. म्हणूनच कदाचित बॉसलाही माझे काम आवडत नसावे. 
- चूक झाल्यावर अनेक अधिकारी नाराज होत. अगदी शेवटी एका कायदेविषयक कंपनीत मला सचिव म्हणून नोकरी मिळाली. 
- काही महिन्यांनी ती नोकरीही गेली. शेवटी मी नोकरीच करायची नाही, असे ठरवले. मी पूर्वी टायपिंग शिकले होते. 
- बचतीतील दोन लाख रुपयांतून मी एक स्कूल सुरू केले. आज मला आनंद वाटतो की लोकांची सेवा करू शकते, असे सारिना रुसो सांगतात.
- त्यांच्या कामाची दखल अगदी जागतिक पातळीवर घेतली गेली. बिल क्लिंटन यांच्या फाऊंडेशनने त्यांच्यासमवेत काम करायला सुरुवात केली.
- ऑस्ट्रेलियात सारिना रूसो यांना नोकरी देणारी राणी (JOB QUEEN) म्हटले जाते.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा... सारिना रूसो यांचा रंजक प्रवास...
बातम्या आणखी आहेत...