आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब!! सौदीचे किंग सलमान यांच्या मोरोक्कोतील हॉलिडेचा खर्च फक्त 640 कोटी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग सलमान यांच्या मागील हॉलिडेचा फोटो.... - Divya Marathi
किंग सलमान यांच्या मागील हॉलिडेचा फोटो....
रियाद- सौदीचे किंग सलमान यांच्या हॉलिडे टूर चर्चेत आहे. ते नुकतेच एक महिन्याच्या आपल्या आवडत्या ठिकाणी मोरोक्को देशात हॉलिडेवर स्पॉट झाले. तेथे ते 74 एकरात पसरलेल्या एका पॅलेसमध्ये थांबले होते. सोबतच त्यांच्या समवेत असलेल्या एक हजार लोकांसाठी लग्झरी हॉटेल बुक करण्यात आले होते. त्यांच्या सेवेत 200 कारचा ताफा. या राजाने एका महिन्याच्या हॉलिडेसाठी तब्बल 6 अब्ज 40 कोटी म्हणजे 640 कोटी रूपये खर्च केले. 12 महिन्यापासून सुरु होते पॅलेसचे काम....
 
- किंग सलमान ज्या 74 एकरावर वसलेलल्या अलिशान पॅलेसमध्ये राहिले होते. त्याच्या डागडुजीचे काम मागील वर्षभरापासून सुरु होते. 
- तेथे नव्याने तीन हेलिपॅड, काही नव्या इमारती तसेच भले मोठे टेंट मारले होते.
-  मोरोक्कोचे तीस शाही सुरक्षारक्षक पॅलेससाठी तैनात आहेत. तसेच वैदयकीय सुविधा, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये असतात तसे डायनिंग हॉलही आहेत.
- या हॉलिडेसाठी त्यांनी 6 अब्ज 40 कोटी 55 लाखांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. 
- मोरोक्को देशाला पर्यटन व्यवसायातून वर्षभरात जेवढा पैसा मिळतो, त्यातील दीड टक्के रक्कम सलमान यांच्या या हॉलिडेतून मिळाल्याचे सांगण्यात आले. 
 
इंडोनेशिया दौरा होता गाजला-
 
- या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राजे सलमान इंडोनेशियाच्या दौऱ्यावर होते. फक्त नऊ दिवसांच्या दौऱ्यासाठी त्यांनी 500 टन सामान सोबत नेले होते. 
- सोबत दिमतीला शेकडो नोकरांचा ताफा व राजासाठी वेगळे कार्गो विमानच नेले होते. 
- या सामानाची काळजी घ्यायलाच 500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना संरक्षण देण्यासाठी 9 हजार सैनिक देखील तैनात करण्यात आले होते.
- राजासाठी जेवण तयार करण्यासाठी 150 शेफची नियुक्ती करण्यात आली होती तर इंडोनेशियाच्या ज्या ज्या मशिदींना ते भेट देणार होते, तिथेही अलिशान शौचालय बांधण्यात आली होती. 
- राजे सलमान यांनी 2015 मध्ये वॉशिंग्टनला भेट दिली होती तेव्हा 222 खोल्यांचे आलिशन हॉटेलच त्यांनी बुक केले होते. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, किंग सलमान यांच्या मागील दौ-याचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...