आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत आहे सोन्याचे ATM, असेच आणखी काही धक्कादायक FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरात मिडल ईस्ट आशियाचा असा देश आहे जो सात छोट्या अमिरातनी (शेख शासित राज्य) बनलेला आहे. यात अबू धाबी, दुबई, शारजाह, रस अल-खैमा, अजमन, उम्म अल-कैवैन आणि फुजैऱ्ह यांचा समावेश आहे. 1873 ते 1947 पर्यंत हा प्रदेश ब्रिटिश भारताच्या राजवटीखाली होती. त्यानंतर याचे शासन लंडनच्या परराष्ट्र विभागाकडून संचलित केले जाऊ लागले होते. 2 डिसेंबर 1971 मध्ये आखातातील अमिरात फेडरल स्टेट म्हणून एकत्र आले आणि संयुक्त अरब अमिरातची स्थापना झाली. 1972 मध्ये रस अल-खैमा यात सहभागी झाले होते.

यूएईशी संबंधित काही फॅक्ट्स
ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) च्या रिपोर्टनुसार, तेल उत्पादनाच्या बाबत यूएई जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. पश्चिम आशियामधील सर्वात विकसित अर्थव्यवस्था म्हणून या देशाच्या इकॉनॉमिचा उल्लेख होतो. विशेष म्हणजे, दुबईतील नागरिकांना प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) द्यावा लागत नाही. दुसरे वैशिष्ट्य हे की जगातील सर्वात उंच बिल्डिंग देखिल येथेच आहे. याशिवाय मानव निर्मित सर्वात मोठे सी-पोर्ट आणि सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलाही हा देश आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, दुबईतील सोन्याचे एटीएम आणि आणखी काही FACTS
बातम्या आणखी आहेत...