ज्या व्यक्तीला आपण भरपूर केस असल्याचे पाहतो आणि नंतर काही दिवसातच त्याला अचानक टक्कल पडलेले पाहिले तर आपल्याला विचित्र वाटते. असेच काहीसे काही जनावरांसोबतही होते. आज आम्ही आपल्याला दाखविणार आहोत अशाच बिना केसांच्या जनावरांचे फोटोज. ओळखणे गेले अवघड....
यातील बहुतेक प्राण्यांना आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र, केसाशिवाय ते एलियनप्रमाणे दिसत आहेत. काही प्राण्यांना नीट पाहिले तर ते ओळखणेही अशक्य होते. आता जरा या प्राण्यांनाच पाहा. तुम्हाला वाटेल की हा प्राणी एखाद्या देशातील यूनिक प्राणी असेल. मात्र तसे काहीही नाही कारण तुम्ही या प्राण्यांना अनेकदा नक्कीच पाहिलेले आहे. अहो हा कुत्रा नाहीये. विचित्र दिसणारा हा प्राणी अस्वल आहे. होय, नेहमी केसाने झाकोळलेले अस्वल हे बिन केसाचे असे दिसते. हा फोटो जर्मनीतील एका प्राणीसंग्राहातील टिपला आहे. कोणत्या तरी अज्ञात आजाराने या अस्वलाचे केस अचानक निघून गेले आणि ते असे दिसू लागले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा आणि ओळखा इतर प्राणी.....