इंटरनॅशनल डेस्क- यूरोपमधील फॅशन जगतात सापांच्या कातडीच्या वाढत्या मागणीने दक्षिण पूर्व आशियाई देशातील अजगर या सापाच्या प्रजाती धोक्यात येण्याची शक्यता आहे. याची संख्या वेगाने घटू लागली आहे. कारण त्याच्या सुंदर त्वचेची, कातडीची मागणी यूरोपीय फॅशन उद्योगात वाढल्याने अशा अजगरांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘इंटरनॅशनल ट्रेड सेंटर’च्या एका रिपोर्टनुसार, ‘दक्षिण पूर्व आशियाई देशातील अजगर, त्याची कातडी, मास तसेच परंपारिक चीनी औषधींसाठी मारली जात आहेत. याच निमित्ताने आज तुम्हाला जगातील सर्वात मोठे सापाचा खाटिकखाणा याबाबत माहिती सांगणार आहोत. जगभर स्नेक स्किन बॅग किंवा जॅकेटची मोठी मागणी...
- सापाचा खाटिकखाणा इंडोनेशियातील जावाई गावात आहे. येथे रोज हजारों साप मारले जातात.
- यानंतर त्याची कातडी काढील जाते. या गावातील लोकांचा हाच व्यवसाय आहे.
- या कातडीपासून बॅग बनवल्या जातात. या हॅंड बॅगची जगभरातील फॅशन जगतात चांगलीच मागणी आहे.
- इंडोनेशियात एक स्नेक स्किन बॅग बनविण्यासाठी कारागिरांसाठी केवळ २० पौंड दिले जातात.
- पश्चिमी जावा प्रांतातील एका कंपनीत सापाच्या कातडीपासून बॅग, बूट, पर्स आणि बेल्ट बनवले जातात.
- बॅग निर्माता सुनार्ता सांगतात की, सामान्यपणे या बॅगच्या किंमती माफकच असतात.
- मात्र, फॅशन इंडस्ट्रीजद्वारे खरेदी केल्यास या बॅगची किंमत वाढते.
विषारी सापांना मारण्याची प्रोसेस-
- सापांना एका ओवनमध्ये टाकून उखळून मारले जाते त्यानंतर त्याची कातडी काढली जाते.
- यानंतर सापाच्या बॉडीत पाठीमागून एक चाकू घातला जातो त्यामुळे कातडी सहज मोकळी होते.
- यानंतर ही कातडी सरळ करून घेतली जाते.
- केवळ सापाच्या कातडीचाच व्यापार हे लोक करत नाहीत तर सापाचे मांस, मटणही विकले जाते.
- याबाबत सांगितले जाते की, सापाच्या मटणाने पुरुषार्थ वाढतो. त्यामुळे त्याची चांगलीच मागणी राहते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सापाच्या मीट शॉपमधील नजारा...