Home »International »Bhaskar Gyan» Soviet Family Having Three Lions As Pets

सिंहाबरोबर राहणारे रशियातील एक कुटूंब, पाहा दिलखेचक PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Mar 20, 2017, 16:50 PM IST

इंटरनॅशनल डेस्क- काही महिन्यांपूर्वी हॉलिवूड अभिनेत्री मिलाने ग्रीफ‍िथची आपल्या सिंहासोबत जुने फोटोजसमोर आले होते. मिलानेचा पाळीव सिंह कुटूंबातील एक सदस्य म्हणून राहत होता. सोव्हिएत युन‍ियनच्या कालखंडातील अशाच एका कुटूंबाची छायाचित्रे समोर आली आहेत. आता अजर्बैजानच्या नावाने ओळखल्या जाणा-या देशातील बकू शहरात एक कुटूंब 1970 साली एका छोट्या अपार्टमेंटमध्‍ये राहत होते.
व्यवसायाने वास्तुविशारद असलेले लिओ कुटूंबाचे प्रमुख होते आणि घरात त्यांची पत्नी, दोन मुले असा परिवार होता.लिओ यांना जंगलात स‍िंहिणीचे एक जखमी छावा मिळाला. त्यांनी त्याला आपल्या घरी आणले. लिओ आणि त्यांच्या पत्नीने सिंहाच्या छावाला खूप जीव वाचले. त्याला किंग या नावाने कुटूंबातील सदस्य आवाज देत होते.
किंगची जखम बरी झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला, परंतु तो त‍िथे जाण्‍यास तयार नव्हता. मग लिओने त्याला घरी आणले आणि तो कुटूंबाचा सदस्य बनून गेला. घरातील प्रत्येक सदस्यांच्या छोट्यामोठ्या कामात सहभाग व्हायचा आणि मुलांसह खेळायचा. शेजा-यांना किंगच्या राहण्‍याने अनेक वेळा हरकती घेतल्या. परंतु लिओने त्याला आपल्यापासून लांब ठेवले नाही.
किंग नंतर चित्रपटातही दिसू लागला. याने लिओ कुटूंबाला उत्पन्न मिळत होते आणि फ‍िरण्‍याचीही संधी मिळत होती. मात्र अचानक एका अपघातात किंगचा जीव घेतला. याने लिओ कुटूंबीय दु:खी झाले आणि दुसरा सिंह आणण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. काही दिवसानंतर एक दुसरा छावा आणण्‍यात आला. काही दिवशांनी लिओचे निधन झाले. यानंतर 1980 साली एका दुखद घटनेत लिओची मुलगी आणि त्या सिंहाचा मृत्यू झाला.
पुढे पाहा, सिंहासह राहणा-या रशियाच्या लिओ कुटूंबाचे फोटोज...

Next Article

Recommended