आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे स्टीव्ह जॉब्जच्या स्वप्नातील Apple चे नवे आकर्षक ऑफिस, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपलचे हे हेड क्वार्टर कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत आहे. - Divya Marathi
अॅपलचे हे हेड क्वार्टर कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत आहे.
इंटरनॅशनल डेस्क- बहुप्रतिक्षीत अॅप्पल कंपनीचा iPhone 8 आज सॅन फ्रान्सिस्को येथे म्हणजेच सिलीकॉन व्हॅलीतील कुपरटिनो येथील नव्या ऑफिसमध्ये लाँच होईल. हा कार्यक्रम नवीन स्पेसशिप कॅम्पसमध्ये तयार करण्यात आलेल्या स्टीव्ह जॉब्ज प्रेक्षागृहात होत आहे. नवीन कॅम्पसची कल्पना स्टीव्ह जॉब्ज यांचीच असल्याने हे प्रेक्षागृह त्यांना समर्पित करण्यात आले आहे. सहजसोपं पण तेवढंच आकर्षक आणि अद्वितीय गॅझेटसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅपल कंपनीने आपले 175 एकरातील नवे ऑफिस, कॅम्पस आपल्या तंत्रासारखेच डिझाईन केले आहे. अमेरिकेतील कुपरटिनो, कॅलिफोर्नियात अॅपलच्या नव्या मुख्यालयाची मुख्य इमारत गोलाकार आकाराची आहे. असे आहे स्टीव्ह जॉब्जच्या स्वप्नातील प्रेक्षागृह....
 
-  या प्रेक्षागृहातील पहिला फोटो नुकताच जारी करण्यात आला. येथील खुर्च्या नैसर्गिक लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत. 
- समोर मोठे व्यासपीठ असून येथेच सीईओ टीम कुक नवीन उत्पादने सादर करतील. या रंगमंचाचा समोरचा भाग स्पेसशिप कॅम्पसच्या बाजूने ठेवण्यात आला आहे. 
- येथून घनदाट झाडी दिसते. याचा मोठा भाग जमिनीखाली आहे. कॅम्पसमधील सर्वात उंच जागेवर हे बनवण्यात आले आहे. 
- यात एक हजार दर्शक बसू शकतील अशी प्रेक्षागृहाची क्षमता आहे. जुन्या प्रेक्षागृहामध्ये 7 हजार पाहुणे बसण्याची जागा होती.
- 165 फूटाचा व्यास असलेल्या या प्रेक्षागृहाचे 20 फूट उंच प्रवेशद्वारावर लिंड्रिकल काच लावण्यात आली आहे. 
- लाँचिंगनंतर पाहुण्यांना डिव्हाईसचा वापर करून पाहता यावा यासाठी व्यासपीठ मोठे ठेवण्यात आले आहे. 
- 1, 20, 000 स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेल्या या प्रेक्षागृहाचे छत एकसंघ आहे. 
- आजचा कार्यक्रम नव्या अंदाजात लाईव्ह करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 
 
13 हजार कर्मचारी बसू शकतील या नव्या कॅम्पसमध्ये-
 
- या नव्या बिल्डिंगला ‘अॅपल पार्क’ नाव दिले गेले आहे, जे स्पेसशिप सारखे आहे. 
- सुमारे 175 एकरात पसरलेले हे ऑफिस जगातील सर्वात मोठे ईको फ्रेंडली ऑफिस आहे. 
- ऑफिसच्या बाहेरच नाही, तर कॅम्पस एरियात इतकी हिरवळ आहे की, कर्मचा-यांना निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखे वाटेल. 
- ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा आणि सुर्यप्रकाश येईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. ज्यामुळे वर्षातील नऊ महिने ऑफिसमध्ये एसीची गरज खूपच कमी राहील. 
- या बिल्डिंगची खास बाब ही की, याच्या पायाभरणीत 700 ‘बेस आयसोलेशन’ जोडले गेले आहेत, ज्यात भूकंप आला तरी इमारतीला नुकसान होणार नाही. 
- आत्पकालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कॅम्पसमध्ये रूग्णालय, फायर हाऊस, पोलिस स्टेशन यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
- येथे एक हजार लोक बसू शकतील या क्षमतेचे एक ऑडिटोरियम सुद्धा बनवले गेले आहे, ज्यात कंपनीचे अधिकारी कंपनी संबंधित माहिती मीडिया आणि अन्य इतर लोकांशी देऊ शकतील. 
- या बिल्डिंगसाठी एकून 33 हजार 412 कोटी रूपये (5 बिलियन डॉलर) खर्च आला आहे. चार मजली इमारतीत सर्वात मोठे 360 डिग्रीत कोडवर वाकलेले ग्लास लावलेले आहेत. 
- या ऑफिसचे पूर्ण डिझाईन अॅप्पलचे संस्थापक स्टीव जॉब्सने 2011 मध्ये केले होते. हे ऑफिस जॉब्सचे स्वप्न मानले जाते.
- मात्र, 5 ऑक्टोबर, 2011 मध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या स्मरणार्थच तेथे एक थिएटर बनवले गेले आहे. तेथेच आजचा भव्य कार्यक्रम होत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अॅप्पलच्या या नव्या ऑफिसचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...