आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रूराष्ट्रावर बॉम्बहल्ल्याचा नजारा, येथे सोफा-खुर्चीवर बसून पाहतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅलेस्टाईनवर होत असलेले बॉम्बहल्ले सोफा-खुर्चीवर बसून पाहताना लोक.... - Divya Marathi
पॅलेस्टाईनवर होत असलेले बॉम्बहल्ले सोफा-खुर्चीवर बसून पाहताना लोक....
इंटरनेशनल डेस्क- इस्त्रायल- पॅलेस्टाईन यांच्यातील रक्तरंजित इतिहास व संघर्ष काही नवा नाही. आता तर अशी स्थिती असते की, या दोन देशांदरम्यान कधीही युद्ध होऊ शकेल अशी आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने छुपे हल्ले केले की, इस्त्रायल पॅलेस्टाईनवर खुलेआम बॉम्बहल्ले करतो. याचा थेट फटका पॅलेस्टाईनचे सामान्य नागरिकांना बसतो. तर, दुसरीकडे, इस्त्रायलचे लोक या बॉम्बहल्ल्याची मजा घेतात. सोशल मीडियात इस्त्रायल लोकांचे हे फोटो नेहमीच वायरल होत असतात. जेथे हे लोक आरामात बसून पॅलेस्टाईन उद्धवस्त होत असताना पाहत असतात. पिकनिक म्हणून बॉम्बहल्ल्याची घेतात मजा....
 
-बॉम्बहल्ले एन्ज्वॉय करतानाचे इस्त्रायलच्या लोकांचे हे फोटोज 2014 मध्ये वायरल झाले होते.
- मात्र, त्यापूर्वीही व त्यानंतर अनेक असे फोटोज समोर आले आहेत.  
- इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जेव्हा जेव्हा युद्ध सुरु असते तेव्हा इस्त्रायलचे लोक उंच उंच टेकड्यावर पोहचतात. 
- एवढेच नव्हे तर, येथे लोक एखाद्या पिकनिकसारखी मजा लुटतात. अनेक लोक तर सोफा- खुर्ची व इतर खाण्या-पिण्याचे साहित्य घेऊन येतात. 
- ज्यावर बसून ते पॉपकॉर्न खात राहतात व पॅलेस्टाईनवर होत असलेले बॉम्बहल्ले एन्जॉय करतात. 
- आपल्या माहितीसाठी हे की, इस्त्रायलने आपल्या संपूर्ण देशात एंटी मिसाईल डिफेन्स सिस्टिम यंत्रणा बसविली आहे. ज्यामुळे रॉकेट किंवा मिसाईल सहजपणे हल्ला करू शकत नाही. 
 
1948 पासून सुरुय रक्तरंजित युद्ध- 
 
- सन 1948 मध्ये विभाजन झाल्यानंतर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन बनले.  
- इस्त्रायल स्वतंत्र देश बनताच अरब-इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु झाले. 
- कारण अरब देशांना इस्त्रायल देशाचे अस्तित्त्व मान्य नव्हते व आजही नाही. 
- या युद्धामुळे पॅलेस्टाईनमधील लाखों लोक विस्थापित झाले. तसेच मोठा भूभाग इस्त्रायलच्या ताब्यात आला. 
- तेव्हापासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत लाखो लोकांनी जीव गमवला आहे. 
- 7 मार्च 1966 रोजी पॅलेस्टाईन संसदेची स्थापना झाली होती. त्या निमित्ताने आज आम्ही दोन्ही देशांदरम्यान झालेल्या युद्धाचे फोटो घेऊन आलो आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...