इंटरनॅशनल डेस्क- एयर-शोच्या इतिहासात तशा तर अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, पश्चिम जर्मनीतील कॅसरस्लॉटर्न शहरातील अपघात फारच भयानक होता. खरं तर त्या दिवशी (28 ऑगस्ट, 1988) रोजी एयर-शो दरम्यान तीन फायटर जेट्स आपापसात धडकल्याने खाली असलेल्या गर्दीवर पडली होती. या अपघातात तीन पायलटसह 70 लोकांचा मृत्यू जागेवरच झाला होता. तर साडेतीनशेहून अधिक लोक जखमी झाले होते. एयर शोत अनेक देशांनी सहभाग घेतला होता तसेच तो पाहायला तीन लाख आले होते. आकाशात ‘लव्ह’ चे डिझाईन काढणार होते फायटर जेट्स...
- एयर शोत इटली एयरफोर्सच्या नऊ फायटर जेट्सनी सहभाग घेतला होता. सिग्नल मिळताच एकाच वेळी सर्व जेट्सने उड्डाण केले आणि हवेत कसरती सुरु केल्या.
- या दरम्यान विचित्र स्थिती तेव्हा झाली जेव्हा ही जेट्स आकाशात ‘लव्ह’ चे डिझाईन बनवणार होते. सर्व काही ठीक-ठाक चालले होते आणि लोक याची मजा घेत होते.
- या दरम्यान 8 विमानांचे ‘लव्ह’ डिझाईन बनणार होते आणि 9 व्या जेट्सला लव्ह भेदणा-या तीराचे डिझाईन तयार करायचे होते.
- खूप उंचावर गेल्यावर आठ जेट्सनी खाली येत डिझाईन तयार करायला लागली. दिलचे डिझाईन पूर्ण झाले होते. आता वेळ 9 व्या जेटची होती ज्याला लव्ह भेदण्यासाठी तीर बनवायचा होता.
- त्याच दरम्यान जेटच्या पायलटकडून एक चूक झाली आणि ठरलेल्या जागेपेक्षा ते विमान त्याच्याखालून जास्तीचे खाली आले आणि दोन जेट्सला धडकले.
- क्षणात सर्व काही घडले होते. तरीही इतर सहा वैमानिकांनी चपळता दाखवत आपापली विमानांची दिशा बदलून बाजूला घेतली व कसा तरी आपला जीव वाचवला. तर धडकलेली तीन विमानांना हवेतच आग लागली व प्रेक्षकांच्या गर्दीवर खाली कोसळली.
जेट्स कोसळताच भयानक स्थिती-
- तीन जेट्सला हवेत आग लागताच त्याच्या आगीचे गोळे झाले व खाली पाहत असलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर ते गोळे पडू लागले.
- एका जेटचा भला मोठा मलबा सरळ खाली कोसळला जेथे प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. आगीच्या भक्ष्यस्थानी शेकडो लोक लपटले.
- या अपघातानंतर तेथे एकच गोंधळ उडाला व अफराटफर माजली. लोक भीतीने इकडे-तिकडे पळू लागले. या गोंधळात लोक एकाच बाजूने धावू लागले. त्यामुळे भगदड माजली आणि शेकडो लोक जखमी झाले.
- मात्र तेथे अनेक हेलिकॉप्टर सुद्धा होती ज्याच्या मदतीने जखमींना तत्काळ रूग्णालयात दाखल केले गेले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, त्या भयानक अपघाताचे फोटोज...