आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लू व्हेल, डार्कनेट गेमपेक्षा घातक; लहानग्यांना बलात्कारासाठी प्रवृत्त करतो हा गेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - भारतासह जगभरात ब्लू व्हेल आणि डार्क नेट ऑनलाइन गेम्सची दहशत पसरली असताना आणखी एका गेमपासून सावध होण्याची वेळ आली आहे. ब्रिटनच्या 'रेपले' नामक या गेमने जगभरात खळबळ माजली आहे. या गेममुळे रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, ब्रिटन आणि जपानच्या संसदेने या गेमवर बंदी लावली आहे.
 
असा आहे हा गेम...
> लाँच होण्याच्या 3 वर्षांतच रेपले नावाच्या या गेमवर बंदी आली. विविध देश आपल्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्सला त्यावर लक्ष ठेवण्याचे आणि बंदी लावण्याचे आदेश काढत आहेत. 
> ब्लू व्हेल हा गेम जीव देण्यासाठी विवश करतो. मात्र, रेपले हा गेम दुसऱ्यांचा खून करण्यासाठी चिथावणी देतो. एवढेच नव्हे, तर बलात्कार करण्यासाठी एवढे प्रवृत्त केले जाते की ते खेळणारे लोक भर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा मुलींची छेड काढणे किंवा अतीप्रसंग करायला विवश होतात. 
> अशात केवळ ब्लू व्हेलच नव्हे, तर आपल्या पाल्यांना रेपले पासून सुद्धा सावध करण्याची वेळ आली आहे. सायबर जगतात असे कित्येक गेम्स आहेत, ज्यावर बंदी असतानाही ते छुप्या संकेतस्थळांवर किंवा टोरेंट प्लॅटफॉर्मवरून डाऊनलोड केले जातात. अशा प्रकारचे गेम समाजात बॉम्बपेक्षा घातक आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, काय-काय होतेय या घाणेरड्या गेममध्ये...
बातम्या आणखी आहेत...