आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे जगातील पहिले Sand Hostel, 24 टन वाळूसह 21 दिवसात तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील वाळूपासून बनविलेले पहिले हॉस्टेल... - Divya Marathi
जगातील वाळूपासून बनविलेले पहिले हॉस्टेल...
या जगात राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हॉस्टेलबाबत जे समुद्रकिनारी आणि ते ही वाळूने बनवलेल्या. हे जगातील पहिले 'सॅंड हॉस्टेल' असल्याचे सांगितले जात आहे. कसे दिसतेय हे हॉस्टेल...
 
आस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टच्या ब्रॅंड बीचवर संपूर्णपणे वाळूने बनविलेले Sand Hostel बनवले गेले आहे. 20 सप्टेंबर 2017 रोजी हे हॉस्टेल सामान्य लोकांसाठी खोलले आहे. हे हॉस्टेल बनविण्यासाठी 21 दिवस लागले आणि 24 टनांहून अधिक वाळूचा वापर केला आहे.
 
या हॉस्टेलमध्ये एक लग्जरी रूम आणि 8 बेडची एक डॉरमेट्री आहे. यात एक आउटडोर बार आहे. हा एक ओपन बार आहे ज्याच्या खाली बसून तुम्ही आकाशातील चांदण्या पाहत रात्र घालवू शकता. या हॉस्टेलमध्ये योगा, समुद्र किना-यावर खेळल्या जाणारे खेळाची व्यवस्था केली आहे. रात्री लाईव्ह म्यूजिक ऐकत आपली रात्र रंगीन बनवू शकता.
 
या हॉस्टेलची बांधणी वर्ल्ड फेमस sand sculptor आर्टिस्ट Dennis Massoud यांनी केली आहे. त्यांना 'द सॅंडमॅन' नावाने ओळखले जाते. हे हॉस्टेल आठवड्यातून केवळ 3 दिवस, बुधवार ते शुक्रवार असे खुले राहते.
 
खरं तर वाळूपासून बनलेले हॉटेल नेदरलॅंडमध्ये बनवले होते. मात्र, तेथे सॅंड आर्ट कॉम्पिटिशन दरम्यान ते बनविले होते. आस्ट्रेलियातील हे हॉस्टेल मात्र सामान्य लोक व पर्यटकांसाठीच बनविले गेले आहे. त्यामुळे याला जगातील पहिले हॉस्टेल म्हटले जात आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वाळूत बनलेल्या हॉस्टेलची शानदार पिक्चर्स...
बातम्या आणखी आहेत...