आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधींना नव्हती मुलगी, आज सहा देशात राहतात नातू- पणतूसह 154 वंशज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- महात्मा गांधी यांची आज (2 ऑक्टोबर) जगभर जयंती साजरी होत आहे. महात्मा गांधी यांच्याविषयी आपण शालेय वयापासून काही ना काही वाचत आलो आहोत. गांधीजींविषयी प्रत्येकाला काहींना ना काही माहिती असते. मात्र, त्यांच्या परिवाराबद्दल बहुतेकांना माहिती नाही. गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज आज आम्ही तुमच्यासाठी गांधी कुटुंबियांविषयी खास माहिती घेऊन आलो आहोत.
 
महात्मा गांधींजींचे आज 154 वंशज जगातील सहा देशांमध्ये राहत आहेत. यात त्यांचे नातू, नातूची मुले व नातवंडे आदींचा समावेश आहे. हे सर्व उच्च विद्याविभूषीत असून, कोणी प्राध्यापक तर कोणी पत्रकार आहेत. अगदी शास्त्रज्ञ, आयएएस, वकिल, इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत.
 
महात्मा गाधींच्या वंशजात 12 डॉक्टर, 12 प्राध्यापक, 5 इंजिनिअर, 4 वकील, 3 पत्रकार, 2 आयएएस, 1 शास्त्रज्ञ, 1 चार्टड अकाऊंटंट, 5 खासगी कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि 4 पीएचडी धारक आहेत. त्यांच्या कुटुंबात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. हे सर्व लोक भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे राहातात. विशेष म्हणजे महात्मा गांधींना मुलगी नव्हती, याचे त्यांना कायम शल्य होते. मात्र सध्याच्या स्थितीत त्यांच्या वंशजांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.
 
महात्मा गांधींचे कुटुंब:
 
वडील :करमचंद
आई : पुतलीबाई
मोठी बहीण:  रलियत
भाऊ:लक्ष्मीदास आणि वहिणी नंद कुंवरबेन
कृष्णदास आणि वहिणी गंगा

गांधीजी आणि कस्तूरबा यांची चार मुले आणि सुना:

हरिलाल- गुलाब (कुटुंबात 68 सदस्य)
मणिलाल -सुशीला (कुटुंबात 39 सदस्य)
रामदास-निर्मला (कुटुंबात 19 सदस्य)
देवदास-लक्ष्मी (कुटुंबात 28 सदस्य)

अशा प्रकारे गांधीजींच्या कुटुंबात 154 सदस्य होतात. गांधीजींच्या चार मुलांना 13 मुले आणि मुली होत्या. त्यांच्या या 13 नातवंडांचे आता मोठे कुटुंब झाले आहे.
 
पुढील स्लाईडद्वारे वाचा, गांधीजींची मुले, नातू, पणतू आणि उर्वरित कुटुंबियांविषयी....
बातम्या आणखी आहेत...