आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशाची अमेरिकेने घेतली होती धास्ती, लपवले होते हवाईदलाचे ठिकाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अख्ख्या जगात आज अमेरिकेला सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखले जाते. मात्र, एक काळ असा होता, की अमेरिकेने जपानची धास्ती घेतली होती. जपानकडून हल्ल्याची एवढी भिती की त्यांना आपल्या हवाई दलाचे ठिकाण लपवावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने आपल्या एयरफोर्सचे ठिकाण लपवण्यासाठी एक बनावट गाव वसवले होते. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून युद्ध छेडले होते. यानंतर अमेरिकेने आपली ठिकाणे सुरक्षित ठेवण्यासाठी बोइंग कंपनीची मदत घेऊन एयरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीजवळ एक बनावट वस्ती तयार केली होती. 
 
एका डॉलरमध्ये विकत घेतली होती जमीन
- 99 परसेंट व्हिजिबल नामक ऑनलाइन मॅगजीनच्या माहितीप्रमाणे, बोइंग कंपनीच्या मदतीने सिएटल येथे बनावट वस्ती बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
- ही जमीन सरकारने एका ट्रक ड्राइव्हरकडून केवळ 1 डॉलर देऊन विकत घेतली होती. अतिशय कमी वेळात बोइंगने त्या ठिकाणी वस्ती तयार केली होती. 
- यातही सरकारने हॉलिवुडचे त्यावेळचे प्रसिद्ध सेट डिझायनर जॉन स्टीव्हर्ट डेट्ली यांची मदत घेतली होती. त्यांनी 17 लाख चौरस फुटांवर वस्ती तयार करण्यासाठी बनावट गल्ल्या, झोपड्या आणि कार सुद्धा डिझाईन केल्या होत्या. 
- याच गावाच्या तळाखाली 30 हजार लोक दिवसरात्र विमाने बनवण्याच्या तयारी लागले होते. एवढ्या मनुष्यबळाने अमेरिकेत दरमहा 300 लढाऊ विमान बनवले जात होते. यात बोइंग बी-17, बी-29 आणि बी-52 अशा घातक विमानांचा देखील समावेश आहे. 
- बोइंगने या कारखान्याचा वापर शीतयुद्धापर्यंत केला. 2010 मध्ये हा कारखाना नष्ट करण्यात आला. 
 
पुढील स्लाड्सवर, वर बनावट वस्ती आणि खाली लढाऊ विमानांचा कारखाना यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...