आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • War Was Fought Between The State Of Israel And A Military Coalition Of Arab States

इस्त्रायलची \'पॉवर\' पाहून जगाने तोंडात घातली होती बोटं, क्षणात उध्वस्त केले होते 400 जेट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्त्रायल आणि अरब जगतातील 7 देशांदरम्यान 1967 साली झालेल्या युद्धाला \'जून वॉर\' नावाने ओळखले जाते. - Divya Marathi
इस्त्रायल आणि अरब जगतातील 7 देशांदरम्यान 1967 साली झालेल्या युद्धाला \'जून वॉर\' नावाने ओळखले जाते.
इंटरनॅशनल डेस्क- मुस्लिम देशांचा सर्वात कट्टर शत्रू देश असलेल्या इस्त्रायलने आपल्या एयरफोर्समध्ये आणखी एक घातक जेट सामील केले आहे. हे फायटर जेट्स सर्वात अत्याधुनिक एफ-35 जेट आहे जे रात्रीही अंधारात शेकडो किमीवरील ऊंचीवरून शिकार करू शकतो. मात्र, इस्त्रायल एयरफोर्ससाठी ही काही मोठी बाब नाही. इस्त्रायलने 50 वर्षापूर्वीच आपल्या एयरफोर्सला इतके मजबूत केले होते की, त्यांनी 8 अरब देशांविरूद्धचे युद्ध केवळ 6 दिवसात जिंकले होते. अरब जगताला आली होती खुमखुमी...
 
- 50 वर्षापूर्वी, 27 मे 1967 रोजी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल नासिर यांनी घोषणा केली होती की, अरबचे लोक इस्त्रायलचा विनाश करू इच्छित आहेत.  
- मे, 1967 मध्ये इजिप्त आणि जॉर्डनमध्ये एक समझोता झाला होतो की, जर आपल्यापैकी कोणावरही हल्ला झाला तर एकमेंकाना साथ द्यायची. 
- खरं तर हे युद्ध इस्त्रायल-इजिप्त सीमेवर सुरु झाले होते, मात्र लवकरच ते अरब जगतात पसरले गेले. 
- इस्त्रायल आणि इजिप्त यांच्या युद्धात इस्त्रायलच्या विरूद्ध जॉर्डन, इजिप्त, इराक, कुवेत, सौदी अरब, सूदान आणि अल्जेरिया यासारखे देश गेले होते. 
- या युद्धाला 'जून वॉर' नावाने ओळखले जाते. युद्ध सुरु होण्याआधी 5 जून रोजी इस्त्रायल एयरफोर्सने इजिप्तचे सुमारे 400 फायटर जेट्स जमिनीवर नष्ट करून टाकली होती. 
- यामुळे इतर देश घाबरले गेले. यानंतर इस्त्रायलने इतर देशांवर तत्काळ हल्ले केले होते आणि हे युद्ध केवळ 6 दिवसात संपले होते. 
 
इस्त्रायलने का केला पहिल्यांदा हल्ला- 
 
- इस्त्रायलचे म्हणणे होते की, जर त्यांना जिंकायचे असेल तर युद्धाच्या आधीच हल्ला करावा लागेल.
- याच कारणामुळे इस्त्रायलने इजिप्त लष्कराच्या लढावू विमानांवर ते बेसावध असतानाच हल्ला केला होता.
- इस्त्रायली हल्लायानंतर इस्त्रायल सीमेवर अरब जगतातील लष्कर गोळा झाले होते.  
-असे झाल्यानंतर सहा दिवस चाललेल्या या युद्धात इस्त्रायलनेच बाजी मारली. अखेर गाझा पट्टी त्यांच्या ताब्यात आली. 
 
हजारो सैनिकांचे गमावले प्राण-
 
- या युद्धात इस्त्रायलचे सुमारे एक हजार सैनिक मारले गेले तर साडेचार हजार जखमी झाले होते.  
- अनेक इस्त्रायली सैनिकांना बंदिस्त करण्यात आले होते. तर, अरब देशांच्या जवानांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त होती. 
- या युद्धात एकटया इजिप्तचे 10 ते 15 हजार सैनिक मारले गेले होते, तर साडे चार हजार सैनिकांना इस्त्रायलने बंदिस्त केले होते. 
- तर, या युद्धात जॉर्डनचे 6 हजार आणि सीरियाचे एक हजार सैनिक मारले गेले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युद्धादरम्यानचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...