आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

634 वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न, 35 हजार तरुणींशी संबंध, वाचा वादग्रस्त फिडेल कॅस्ट्रो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिडेल कॅस्ट्रो - Divya Marathi
फिडेल कॅस्ट्रो
इंटरनॅशनल डेस्क- क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कास्ट्रो यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. 1959 मध्ये क्रांती करून अमेरिकेचे चमचे फुल्गेंकियो बतिस्ता यांची हुकुमशही सत्ता हटवत त्यांनी सत्ता काबीज केली होती. त्यांना कम्युनिस्ट क्यूबाचे जनक मानले जाते. त्यांच्या आयुष्याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध राहिले. त्यांच्यावर बनलेल्या एका डॉक्युमेंट्रीत खुलासा करण्यात आला की, कॅस्ट्रो यांनी 82 व्या वर्षापर्यंत सुमारे 35,000 महिलांशी शारीरिक संबंध बनवले होते. कॅस्ट्रो यांनी दावा केला होता की, त्यांच्यावर 634 वेळा हत्या करण्याचा कट रचला गेला. पुढे जाणून घ्या कॅस्ट्रो यांच्याबाबत....
- क्रांतीच्या आझी फिडेल कॅस्ट्रो एक युवा वकील होते, ज्यांना खूपच कमी लोक ओळखायचे.
- त्यांचा जन्म 1926 मध्ये क्यूबामधील फिडेल अलेजांद्रो कॅस्ट्रो परिवारात झाला, जो परिवार खूपच श्रीमंत होता.
- क्रांती घडण्याआधी ते हुकुमशहाच्या विरोधात 1952 च्या निवडणुकीत उभे राहिले. मात्र मतदान होण्याआधीच ते बंद करण्यात आले.
- लोकक्रांती करण्यासाठी 26 जुलै रोजी फिडेल कॅस्ट्रो यांनी आपल्या 100 सहका-यांसह सॅंटियागो डी क्यूबात सैनिकी बॅरेकवर हल्ला केला. मात्र, त्यात यश आले नाही.
- या हल्ल्यात त्यांचे काही सहकारी मारले गेले मात्र फिडेल कॅस्ट्रो आणि त्याचा भाऊ राउल वाचले. काहींना जेलमध्ये टाकले गेले.
- त्यानंतरही फिडेल कॅस्ट्रो बतिस्ता शासनाविरोधात आंदोलन सुरुच ठेवले.
- हे अभियान त्यांनी मेक्सिकोमध्ये निर्वासित जीवन जगत सुरु ठेवले. तेथे त्यांनी एक छापामार संघटन बनवले.
- ज्याला त्यांनी '26 जुलै मूव्हमेंट' नाव दिले. कॅस्ट्रो यांच्या क्रांतीकारी आंदोलनाला क्यूबात खूप समर्थन मिळू लागले.
- 1959 मध्ये त्यांच्या संघटनेने बतिस्ता यांचे सरकार उखडून फेकले व सत्ता काबीज करत पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष बनले.
- आता क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे बंधू राउल कॅस्ट्रो आहेत.
- कॅस्ट्रो यांच्या क्रांतीकारी आदर्शांसमवेतच त्यांच्या वैयक्तिक जीवनातील बाबी पुढे जगभर चर्चेल्या गेल्या.
- महिलांच्या बाबतीत त्यांच्या एका अधिका-याने सांगितले की, कॅस्ट्रो प्रत्येक दिवशी दोन महिलांशी संबंध बनवायचे.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, क्यूबाचा क्रांतीकारी नेता फिडेल कॅस्ट्रो यांच्यासंबंधित 8 इंटरेस्टिंग फॅक्ट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...