आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या मुस्लिम देशांत लपून-छपून अशा होतात अल्कोहल पार्टीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणमधील यंगस्टर्सची पार्टी... - Divya Marathi
इराणमधील यंगस्टर्सची पार्टी...
इंटरनॅशनल डेस्क- इराणची ओळख एक कट्टरपंथीय देश म्हणून होते. तेथील कडक इस्लामिक नियम-कायद्यामुळे महिलांना हिजाबमध्ये राहावे लागते. तर, पुरुषांसाठी लांब ट्राउजर आणि पूर्ण अस्तीनचे शर्ट घालण्याचा नियम आहे. देशात दारूवर पूर्णपणे बंदी आहे. तर, रेस्टांरंट आणि कॅफेशिवाय तेथे नाईट क्लब किंवा बार पाहायला मिळणार नाहीत. मात्र, इतके बंधने असूनही येथे चोरी-छिपे अल्कोहल पार्टीज होतात. पोलिसांना दिली जाते लाच....
 
- इराणची सेमी-ऑफिशियल न्यूज एजेन्सी ‘फार्स’ च्या रिपोर्टनुसार, दारू-पार्टीचे कल्चर तेथे बहुतेक श्रीमंत फॅमिलीजमध्ये आहे. 
- यंगस्टर्सची दारू-सिगरेटची पार्टी रात्री उशिरापर्यंत चालतात. रिच किड्सच्या बर्थ डेवर अशा पार्टीज सामान्य बाब आहे. 
- ‘फार्स’च्या एका रिपोर्टरने केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासे केले आहेत. रिपोर्टरने दावा केला आहे की, अशा अनेक पार्टीज मी स्वत: अटेंड केल्या आहेत आणि रात्रभर तसा माहौल पाहिला आहे. 
- एका अशाच पार्टीत सहभागी झालेली शबनम नावाच्या तरूणीने रिपोर्टरला सांगितले की, ती आणि तिचे फ्रेंड सर्कल नेहमीच अशा पार्टीज करतात. जर तेथे पोलिस आले किंवा धाड पडली तर पोलिसांना 50 रियाल ( सुमारे दोन हजार रुपये) लाच दिली की काम संपले. 
- पार्टीत सहभागी झालेल्या हाफिज नावाच्या एका तरूणाने सांगितले की, पार्टीजसाठी दारूचे स्मगलिंग केले जाते, आणि हे सर्व पोलिसांना माबित आहे. दारू माफिया सुद्धा पोलिसांना लाच देत दारूसह गांजा-अफीमची पुरवठा करतात. 
 
इराणमध्ये फेमस आहे  ‘शिराज’ वाईन-
 
- इराणमध्ये इस्लामिक क्रांती होण्याआधी म्हणजे 1980 च्या दशकापूर्वी शिराज सिटीत ‘शिराज’ नावाच्या रेड वाईनचे प्रॉडक्शन होत होते.
- येथे वाईन त्या दरम्यान खूपच फेमस होती आणि जगातील अनेक देशात सप्लाय केली जायची. यूरोपियन कंट्रीजमध्ये त्याची मागी मोठी होती. 
- 1980 नंतर जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली व देशात शरीया कायदा लागू झाला त्यानंतर इराणमधील संपूर्ण लाईफ स्टाईल बदलली गेली. 
- तेथील वेस्टर्न लाईफ स्टाईलमध्ये क्रांतीकारी बदलाव आले आणि देशात बारपासून ते क्लबपर्यंत सर्व काही बंद झाले. 
- इराणमध्ये आता सुद्धा  ‘शिराज’ वाईन मिळते मात्र, चोरी-छिपे मार्गाने.  ‘फार्स’च्या रिपोर्टरला सोहराब नावाच्या तरूणाने सांगितले की, तेहराणमधील अनेक घरात लोक शिराज वाईन बनवतात व विकतात. 
 
अयातुल्लाह खेमिनीने बनवली होती स्पेशल फोर्स-
 
- इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर धर्मगुरु अयातुल्लाह रुहोल्लाह खेमेनीने नियम-कायद्याविरोधात जाणा-या लोकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी एक स्पेशल ‘बासजी’ फोर्सची स्थापना केली होती. 
- ‘बासजी’ फोर्सला त्याचे रिवॉल्यूशनरी गार्ड्स म्हटले जाते. या गार्ड्सला संपूर्ण इराणमध्ये पोलिसांसारखे अधिकार दिले आहेत. 
 
तिस-यांदा पकडल्यावर फाशीची शिक्षा- 
 
- इराणमधील सिविल लॉ नुसार, दारू पिणा-यांना मोठा दंड, जेल आणि कोडे मारण्याची मोठी शिक्षेची तरतूद आहे. 
- पहिल्यांदा दारू पिऊन पकडल्यानंतर जेल, दुस-यांदा पकडल्यावर जेल आणि मोठी दंड आणि तिस-यांदा पकडल्यावर थेट फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. 
- वर्ष 2012 मध्ये अशाच दोन व्यक्तींना दारूच्या नशेत तीनदा पकडल्यानंतर फासावर लटकवले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इराणमध्ये कशा होतात दारू पार्टीजचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...