आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनमध्ये विंड स्पोर्टससाठी ओलांडावा लागतो वाळवंटी रस्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात सर्वात सुंदर देशांत स्पेनचाही समावेश आहे. येथील नैसर्गिक वातावरण आणि हवामानामुळेच या स्थानाला विशेष महत्त्व आहे. याव्यतिरिक्त तेथील दक्षिण किना-यावर वसलेले तरिफा टाऊन जगभरात विंड स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. तेथे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाळूचे मोठे ढीग दूरवर पसरलेले दिसून येतात. जोराने वारा वाहू लागताच रस्ते वाळूने झाकले जातात. जोपर्यंत रस्त्यावरून वाळू हटवली जात नाही, तोपर्यंत कोणासही पुढे जाता येत नाही. हे छायाचित्र मायकी डोरा यांनी अपलोड केले असून याला १.४ लाख लाइक्स मिळाल्या. या गावाच्या एका बाजूला भूमध्य सागर आहे, तर दुसरीकडे अटलांटिक समुद्र पसरलेला आहे. या दोहोंमध्ये जिब्राल्टरची खाडी असून येथील पाषाण जगात प्रसिद्ध आहेत.

tumblr.com
बातम्या आणखी आहेत...